'शेवटच्या 48 तासात मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळली'

'शेवटच्या 48 तासात मुस्लिम मतं काँग्रेसकडे वळली'

निवडणुकीच्या एक दिवस अगोदर मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळला. त्यांची संख्या ही 12 ते 13 टक्के आहे. त्याचा परिणाम हा निकालावर दिसून येईल असं केजरीवाल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना स्पष्ट केलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : रविवारी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर उत्सुकता असेल ती लोकसभेच्या निकालाची. कोण बाजी मारणार? सत्ता कुणाची येणार? शिवाय कोणत्या पक्षाला किती मतं मिळणार हे चित्र 23 मे रोजी स्पष्ट होईल. पण, राजधानी दिल्लीतील आम आदमी पक्षाला दिल्लीत किती जागा मिळणार? असा सवाल विचारण्यात आला. त्यावर अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत सात जागा जिंकण्याबाबत आम्ही आशावादी होतो. पण, शेवटच्या क्षणी चित्र पालटलं. कारण, निवडणुकीच्या एक दिवस अगोदर मुस्लिम मतदार काँग्रेसकडे वळला. त्यांची संख्या ही 12 ते 13 टक्के आहे. त्याचा परिणाम हा निकालावर दिसून येईल असं केजरीवाल यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना स्पष्ट केलं.

मतदान अखेरच्या टप्प्यात, सर्वांच्या नजरा पुन्हा उत्तर प्रदेशवर!

'भाजप पुन्हा सत्तेत येणार का?'

यावेळी भाजप पुन्हा सत्तेत येणार का? असा सवाल देखील अरविंद केजरीवाल यांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी ईव्हीएमशी छेडछाड न झाल्यास भाजप पुन्हा सत्तेत येणं कठिण असल्याचं म्हटलं आहे. शिवाय, नरेंद्र मोदी – अमित शहा यांच्याशिवाय सत्ता स्थापन करण्यास कुणी पुढे आल्यास त्याला पाठिंबा देणार असल्याचं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

मोदींना शह देण्यासाठी विरोधकांची तयारी; असा आहे काँग्रेसचा 'मास्टरप्लॅन'

2014मध्ये झाला होता पराभव

2014मध्ये मोदी लाटेत आम आदमी पक्षाला दिल्लीतील सातही जागांवर पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे 2019मध्ये काँग्रेससोबत आम आदमी पक्षानं आघाडी करण्याचा प्रयत्न केला. पण, काँग्रेसनं मात्र हात दिला नाही.

दरम्यान, 23 मे रोजी निकाल लागणार असून काँग्रेसनं विरोधकांना एकत्र घेत मास्टरप्लॅन देखील तयार केला आहे. यामध्ये आम आदमी पक्षाचा देखील समावेश आहे.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त बुद्ध संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देणारा SPECIAL REPORT

First published: May 18, 2019, 11:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading