'पाच वर्षात तुमचे नाही तर मोदींचे 'अच्छे दिन'

नरेंद्र मोदींवर आता विरोधक जोरदार हल्ला चढवत आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 03:55 PM IST

'पाच वर्षात तुमचे नाही तर मोदींचे 'अच्छे दिन'

लखनऊ, 07 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आता विरोधी पक्षांनी एकत्र येत जोरदार प्रचार करायला सुरूवात केली आहे. राष्ट्रीय तसेच राज्य स्तरावर देखील आता भाजपविरोधक एकत्र आले आहेत. भाजपनं पाच वर्षापूर्वी दिलेल्या आश्वासनांची त्यांना आठवण करून दिली जात आहे. त्याआधारे नरेंद्र मोदी आणि भाजपला लक्ष्य केलं जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये देखील सपा - बसपा आणि आरएलडी एकत्र आले आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. देवबंद येथे जाहीर सभेत बोलताना आरएलडी प्रमुख अजित सिंह यांनी सामान्य माणसाला 15 लाख केव्हा मिळणार? असा सवाल केला. शिवाय, नरेंद्र मोदींचे अच्छे दिन आल्याची टीका देखील केली. देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांचे निकाल हे 23 मे रोजी लागणार आहेत.Loading...


भाजप विरोधक आक्रमक

देशातील भाजप विरोधक आता आक्रमक झाले आहेत. त्यांनी नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला आहे. दिल्लीत देखील काँग्रेस - आप एकत्र येण्याला गती येत आहे. तर, राज्यात देखील काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला आव्हान दिलं आहे.

पंतप्रधान पदासाठी उत्तर प्रदेशचं महत्त्व सर्वज्ञात आहे. पण,  2014 प्रमाणे भाजपला उत्तर प्रदेशमध्ये यश मिळेल का? ही शंका आहे. शिवाय, सपा-बसपा आणि आरएलडी एकत्र आल्यानं मतांच्या विभाजनाचा नेमका फायदा कुणाला होणार? यावर देखील सर्व राजकीय गणितं अवलंबून आहेत.

तसेच सर्व्हेमधून देखील भाजपला 2014 प्रमाणे यश मिळणार नाही असं दिसून आलं.त्यामुळे भाजपला आता अधिक जोमानं प्रचार करणं गरजेचं आहे. सध्या विरोधकांसह भाजपचे अनेक नेते मैदानात उतरले आहेत.


SPECIAL REPORT: उत्तर प्रदेशात सायकलवाला बबुआ Vs रिक्षावाला निरहुआ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...