'मी श्रीरामाचा जयजयकार करणार; हिंमत असेल तर ममतांनी अटक करावी'

'मी श्रीरामाचा जयजयकार करणार; हिंमत असेल तर ममतांनी अटक करावी'

'मी श्रीरामाचा जयजयकर करणार, हिंमत असेल तर ममता बॅनर्जी यांनी मला अटक करावी' असं आव्हान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी केलं आहे.

  • Share this:

कोलकाता, 13 मे : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. त्याच पार्श्वभूमिवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरूद्ध अमित शहा परस्परांवर टीकास्त्र डागत आहेत. 'मी श्रीरामाचा जयजयकर करणार, हिंमत असेल तर ममता बॅनर्जी यांनी मला अटक करावी. तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा भाजपच्या रॅली रोखू शकतात. पण, राज्यातील भाजपचा विजयी रथ रोखू शकत नसल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. जॉयनगर लोकसभा मतदारसंघात प्रचार करत असताना अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर हल्लाबोल केला.

'मोदींच्या योजनांकडे दुर्लक्ष'

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदींच्या कोणत्याही योजना राज्यात राबवत नाहीत. मोदींच्या लोकप्रियतेमध्ये वाढ होईल. त्याचा फटका बसेल अशी भीती त्यांना सतत असते असा टोला यावेळी अमित शहा यांनी लगावला. पश्चिम बंगाल सरकारनं जाधवपूरमध्ये अमित शहा यांच्या हेलिकॉप्टर लँडिंगला परवानगी नाकारली. त्यानंतर आता अमित शहा यांनी ममता बॅनर्जींवर जोरदर टीकास्त्र डागलं.

राहुल गांधी उमेदवारासाठी झाले व्हिडिओग्राफर; कुमार गंधर्वांच्या गावातील 'त्या व्यक्ती'ची देशभर चर्चा

भाजप विरूद्ध ममता बॅनर्जी

अमित शहा, नरेंद्र मोदी विरूद्ध ममता बॅनर्जी वाद सध्या देशाच्या केंद्रस्थानी आहे. यापूर्वी देखील फानी चक्रीवादळानंतर दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप झालेले आहेत. शिवाय, लोकसभा निवणुकीची घोषणा होण्यापूर्वी भाजपच्या राज्यव्यापी यात्रेला राज्य सरकारनं परवानगी नाकरली होती. त्यानंतर हे सारं प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये गेलं होतं. ममता बॅनर्जी मला मिठाई पाठवतात असं नरेंद्र मोदी यांनी म्हटल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती.

नरेंद्र मोदींनी ज्या खान मार्केटच्या नावाने टोमणे मारले ते नेमकं आहे काय?

भाजपसाठी पश्चिम बंगाल महत्त्वाचं

लोकसभेसाठी भाजपनं पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या राज्याला हादरा देण्याचा प्लॅन तयार केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये जास्त जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. पण, ममता बॅनर्जींनी त्यांना कडवं आव्हान उभं केलं आहे. भाजपविरोधी आघाडीमध्ये देखील ममता बॅनर्जी सामील झाल्याअसून त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

VIDEO: नाशिकमध्ये आजपासून हेल्मेट सक्ती, विश्वास नांगरे पाटील स्वत: मैदानात

First published: May 13, 2019, 4:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading