भारतात असाही आहे एक मतदारसंघ, जिथे इंटरनेट नसेल तर उपाशी राहतं सारं गाव

भारतात असाही आहे एक मतदारसंघ, जिथे इंटरनेट नसेल तर उपाशी राहतं सारं गाव

भारतातल्या सर्वात गरीब मतदारसंघात पुढच्या टप्प्यात 12 मे रोजी मतदान होणार आहे. या भागतल्या लोकांचे एकेक प्रश्न आपल्या साऱ्या समजुती खोडून काढतील. News18 चा ग्राउंड रिपोर्ट - झारखंडमधल्या एका छोट्या गावातून....

  • Share this:

रुनझुन शर्मा /कोटघर (झारखंड), 7 मे : भर दुपारची उन्हाची वेळ होती, गावातल्या एकमेव रेशन दुकानाबाहेर 20- 25 बायका जमल्या होत्या. सगळ्या आदिवासी भागातून आलेल्या...  रेशन मिळणार हे ऐकून काही किलोमीटर पायपीट करून आलेल्या या आदिवासी स्त्रिया त्या बंद दुकानाबाहेर दुकानदाराची वाट बघत बसल्या होत्या. काही जणी मध्येच उठून दुकानाच्या तुटक्या खिडकीआड डोकावून आतल्या तांदुळाने भरलेल्या गोण्यांकडे आशाळभूत नजरेने बघत होत्या.

शेवटी तासाभराच्या प्रतीक्षेनंतर भोला - तिथला रेशन दुकानदार आला. ऐसपैस बसलेल्या बायका सावरून आपापलं रेशन कार्ड आणि आधार कार्ड हातात काढून उभ्या राहिल्या. त्या सगळ्यांना जवळपास दोन महिन्यांनी रेशनचे तांदूळ मिळणार होते.

निवडणुकीचा हंगाम असल्याने, धान्यपुरवठा वेळेवर आणि पुरेसा झालेला नाही, असं भोलाचं म्हणणं. पण गावकरी म्हणतात, हे नेहमीचंच आहे. रेशनचं धान्य मिळण्यासाठी दोन-दोन महिने वाट पहावीच लागते. ही परिस्थिती आहे झारखंडच्या पश्चिम सिंघभूम या भागाची.

अर्धी मुलं खुजी आणि कुपोषित

सिंघभूमचा हा प्रदेश देशातला सर्वात गरीब भाग असल्याचं सिद्ध झालं आहे. हार्वर्ड विद्यापीठ आणि टाटा ट्रस्ट यांनी या भागात केलेल्या सर्वेक्षण आणि अभ्यासातून काही धक्कादायक आकडेवारी पुढे आली होती. सिंघभूममध्ये जन्मलेली दोन-तृतीयांश मुलं कमी वजनाची असतात. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांच्या सर्वेक्षणात हे सत्य समोर आलं आहे. हे प्रमाण देशात सर्वाधिक आहे. गावातली अर्धी मुलं उंचीला कमी असतात आणि एक तृतीयांश म्हणजे तिनातलं एक मूल अशक्त आणि उंचीच्या मानाने वजन कमी असलेलं असतं. हे या भागाचं वास्तव. पण तरीही इथल्या निवडणुकांमध्ये, प्रचारामध्ये बालकल्याण किंवा बाल आरोग्य हा मुद्दा कधीच चर्चेला आलेला नाही. या मतदारसंघाची लोकसंख्या आहे 12 लाख. येत्या 12 मे रोजी निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात इथे मतदान होणार आहे.

भात आणि मीठ

आम्ही न्यूज18 ची टीम तिथे पोहोचलो तेव्हा गावातल्या एकमेव रेशन दुकानाजवळ स्त्रिया जमल्या होत्या आणि दुकानदार - भोला येऊन बराच वेळ झाला, तरी रेशन वाटपाला सुरुवात झालेली नव्हती. कारण भोलाला इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नव्हती. रेशन कार्ड धारकाच्या अंगठ्याची प्रतिमा - थंब इम्प्रेशन मशीनवर घेऊनच अन्नपुरवठा करायचा नियम आहे. या बायोमेट्रिकसाठी इंटरनेट हवं. शेवटी तिथे जमलेल्या बायकांचा पेशन्स संपत आला.

निर्लज्जपणा, निवडणुकीमुळे सामूहिक बलात्काराची घटना 4 दिवस दाबून टाकली!

बुरहान वाणीच्या गावात शून्य तर, आदिल दारच्या गावात केवळ 15 जणांनी केलं मतदान

सुकरू ही स्त्री आमच्याकडे वळून म्हणाली. "आज रेशन मिळेल असं वाटतंय. गेले दोन दिवस आमच्या घरात रेशनचा दाणा शिल्लक नाहीये. शेजारच्यांकडून मागून भात शिजवते आहे."

सुकरूसाठी रेशन म्हणजे फक्त तांदूळ. खरं तर तिच्याकडे अंत्योदय कार्ड आहे. त्यावर महिन्याला 35 किलो तांदूळ एक रुपया किलो दराने मिळतात. रेशन कार्ड धारकांना तांदुळाबरोबर, डाळ, तेल, साखर असं सगळं मिळणं अपेक्षित आहे. पण या स्त्रियांना तांदुळाशिवाय काही परवडतच नाही. "आमच्या मुलांना थोडं जास्त पाणी घालून शिजवलेला भात आणि चवीला मीठ एवढंच आम्ही देऊ शकतो. सकाळ- संध्याकाळ आमच्याकडे तेवढंच शिजतं", सुमिला- दुसरी एक महिला म्हणाली.

या ठिकाणच्या 300 मतदान केंद्रांवर पडलं नाही एकही मत

'...और बदलके रख दो चौकीदार' काय म्हणाले कम्प्युटर बाबा पाहा VIDEO

गेल्या वर्षभरात इथल्या आदिवासींनी रेशन पुरवठ्याच्या मागणीसाठी छोटी-मोठी आंदोलनं केली. सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान गावकऱ्यांना रेशनच मिळालं नव्हतं, असं ते सांगतात. त्यातून बायोमेट्रिक रजिस्ट्रेशनचे प्रश्न निराळेच आहेत.

इंटरनेट नाही म्हणून...

भोलाने दुकान उघडून अर्धा तास झाला तरी, त्याची बायोमेट्रिक सिस्टीम काही काम करत नव्हती. तिथे रेंज येत नाही, म्हणून उठून तो बायोमेट्रिक मशीनसह एका झाडाखाली गेला. पण तिथे प्रयत्न करूनही इंटरनेटची रेंज काही आली नाही. गावाचे मुखिया - अर्थात सरपंच मुंडा पुढे आले आणि आणखी काही तरुण भोलाच्या मदतीला देत प्रयत्न करत राहा, म्हणाले. आणखी दोन- तीन झाडाखाली इंटरनेटची वाट बघण्यात आणखी 20-25 मिनिटं गेली. पण रेंज काही मिळाली नाही.

हळूहळू घरी मुलं वाट पाहात असतील म्हणत बायकांचा पेशन्स संपत आला होता. त्या आपापल्या गावाकडे जायला निघाल्या... हात हलवत. हा काही त्यांच्यासाठी पहिला प्रसंग नव्हता. आदिवासी लोकांना याची सवय आहे. मशीनवर बोट टेकवलं नाही, तर धान्य मिळणार नाही, हे त्यांना माहिती आहे. छोट्या पोरांना काखोटीला मारत बायका घराकडे निघाल्या. भोला मात्र खूश होता, कारण जमलेल्या आदिवासी गावकऱ्यांनी फार आरडा-ओरडा न करता तिथून काढता पाय घेतला. दर वेळी असं ताटकळून निघून जाण्यापूर्वी ते त्यांचा उद्वेग जाहीर करतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 04:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading