'भाजपनं आपच्या 7 आमदारांना दिली 10-10 कोटींची ऑफर'

भाजपनं आप आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 10:48 AM IST

'भाजपनं आपच्या 7 आमदारांना दिली 10-10 कोटींची ऑफर'

नवी दिल्ली, 02 मे : नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर घोडेबाजाराचा आरोप केला आहे. भाजपनं आम आदमी पक्षाच्या 7 आमदारांना 10 – 10 कोटीची ऑफर दिली. त्यांना विकत घेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरावाल यांनी केला आहे. मागील 3 दिवसांमध्ये भाजपनं आमच्या 7 आमदारांना 10 – 10 कोटींची ऑफर दिली. आमच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न भाजपकडून होत आहे. दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमुल काँग्रेसचे 40 आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना हे शोभत नाही, असं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. यापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी देखील भाजपवर आमदार खरेदीचा आरोप केला होता. अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या आरोपांवर भाजपनं अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.


‘पुलवामा हल्ला हा भाजपचा कट’; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप

राजधानीत राजकीय आरोप – प्रत्यारोप

राजधानी दिल्लीत आपनं सात जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेससोबत लोकसभा निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव देखील आपनं दिला होता. पण, काँग्रेसच्या दिल्लीतील नेतृत्वानं मात्र आपनं दिलेला हात फेटाळून लावला. भाजपनं देखील तगडे उमेदवार मैदानात उतरवले असून आता दिल्ली कोण जिंकणार हे पाहावं लागणार आहे. राजधानी दिल्लीत आपची सत्ता आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत दिल्लीकर कोणाला साथ देणार हे पाहावं लागणार आहे.

Loading...


ऐतिहासिक चारमिनारचा काही भाग कोसळला

भाजप - आप आमने-सामने

लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपनं गौतम गंभीरला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. पूर्व दिल्लीतून गौतम गंभीर लोकसभेच्या मैदानात उतरला आहे. यापूर्वी आपनं गौतम गंभीरवर देखील दोन मतदान ओखळपत्र असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर भाजपनं देखील केजरीवाल यांच्या पत्नीकडे दोन मतदान ओखळपत्र असल्याचा आरोप केला होता.


SPECIAL REPORT : अशा प्रकारे माओवाद्यांनी केला भ्याड हल्ला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 09:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...