News18 Lokmat

'विरोधकांनी साध्वी प्रज्ञांवर खोटे खटले दाखल केले', अमित शहांकडून पाठराखण

अमित शहा यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना दिलेल्या उमेदवारीचं समर्थन केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2019 11:18 AM IST

'विरोधकांनी साध्वी प्रज्ञांवर खोटे खटले दाखल केले', अमित शहांकडून पाठराखण

नवी दिल्ली, 22 एप्रिल : मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद हेमंत करकरें यांच्याबद्दल साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलेल्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. विरोधकांसह सर्वच स्तरातून त्याचा निषेध केला गेला. काँग्रेसनं तर उमेदवारी रद्द करावी अशी मागणी केली. दरम्यान, पंतप्रपधान नरेंद्र मोदी यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांना दिलेल्या उमेदवारीची पाठराखण केली. त्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी देखील साध्वी प्रज्ञासिंह यांची पाठराखण केली आहे.

यावर बोलताना, समझोता बॉम्बस्फोटामध्ये खोट्या केस दाखल केल्या गेल्या. स्वामी असीमानंद आणि इतर लोकांविरोधात खोट्या केस तयार करून त्यांना आरोपी बनवलं गेलं. शिवाय, पहिल्यांदा पकडलेल्या लोकांना का सोडलं? असा सवाल देखील यावेळी अमित शहा यांनी करत साध्वी प्रज्ञासिंह यांचं समर्थन केलं आहे.


रोहित तिवारी हत्या प्रकरणाला नवीन वळण, पत्नी पोलिसांच्या ताब्यात


Loading...

साध्वींच्या उमेदवारीबद्दल काय बोलले अमित शहा

साध्वी प्रज्ञासिंह यांना भाजपनं भोपाळमधून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. साध्वी प्रज्ञाच्या बाबतीत बोलायचं झालं तर, हिंदू दहशतवाद्याच्या नावाखाली खोटी केस तयार केली गेली. देशभरात हिंदू संस्कृतिला बदनाम केलं गेलं. त्यानंतर जेव्हा न्यायालयात केस दाखल झाली तेव्हा ती खोटी असल्याचं दिसून आलं. यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस यांनी देखील साध्वींच्या उमेदवारीचं समर्थन केलं होतं.


माढ्यातील भाजप उमेदवार रणजितसिंहाचा मराठा क्रांती मोर्चाकडून निषेध


काय म्हणाल्या होत्या साध्वी प्रज्ञासिंह

'हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझा शाप भोवला, असं वादग्रस्त विधान साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलं होतं. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच सव्वा महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारले असं विधान साध्वी यांनी केलं होतं. दरम्यान, या विधानावरून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली होती.


VIDEO: प्रियांका गांधींनी IAS झालेल्या तरुणीची घरी जाऊन घेतली भेट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 11:10 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...