वाराणसी, 17 मे : देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. आरोप – प्रत्यारोपांनी राजकीय मैदान गाजताना दिसत आहे. अनेक नेते वैयक्तिक टीका – टीपण्णी करताना देखील दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बसपा प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नीवरून मोदींवर निशाणा साधला होता. त्यांच्या या विधानाला आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी वाराणसीमधील पत्रकार परिषदेमध्ये उत्तर दिलं आहे. 'मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीची चिंता करू नये. त्यांनी स्वत: लग्न करावं' असं प्रत्युत्तर रामदास आठवले यांनी मायावतींना दिलं आहे. यावेळी त्यांनी सपा – बसपावर देखील टीका केली.
तर, नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधानपदावर बसतील अशा शब्दात रामदास आठवले यांनी अखिलेश यादव यांच्यावर टीका केली. 19 मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून 23 मे रोजी निकाल लागणार आहेत.
23 मे रोजी NDAला बहुमत मिळेल – बाबा रामदेव
काय म्हणाले बाबा रामदेव
योगगुरू बाबा रामदेव यांनी लोकसभा निवडणूक 2019मध्ये NDAला पूर्ण बहुमत मिळेल. NDAचं सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे. शिवाय, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी विरोधीपक्षांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. माझ्या भविष्यवाणीनं 23 मे रोजी देशातील काही राजकारण्यांचं स्वास्थ बिगडेल. त्यांना टेन्शन येईल. शिवाय, त्यांचं मानसिक स्वास्थ बिघडेल असं देखील बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. गुरूवारी हरिद्वार येथील कार्यक्रमात बोलत असताना बाबा रामदेव यांनी सरकार NDAचं बनेल असा विश्वास व्यक्त केला. देशाला मजबूत आणि स्थिर सरकार मिळेल अशी आशा देखील यावेळी बाबा रामदेव यांनी व्यक्त केली. यावेळी बाबा रामदेव यांनी पश्चिम बंगालमधील राजकीय परिस्थितीवर देखील भाष्य केलं.
वैतागलेल्या महिलेनं चपलेनं पतीला धू-धू धुतलं, VIDEO व्हायरल
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.