प्रियांका गांधींसमोर नरेंद्र मोदींबद्दल मुलांचे अपशब्द; आणि मग...

प्रियांका गांधीसमोर अमेठीतील मुलांनी नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 10:24 AM IST

प्रियांका गांधींसमोर नरेंद्र मोदींबद्दल मुलांचे अपशब्द; आणि मग...

अमेठी, 02 मे : लोकसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधी – वाड्रा सध्या जोरदार प्रचार करत आहेत. सोमवारी अमेठीमध्ये प्रचार करत असताना प्रियांका गांधीसमोर काही मुलांनी नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मुलांनी चौकीदार चोर है! चौकीदार चोर है! अशा घोषणा दिल्या. पण, अचानकपणे मुलांनी आपल्या घोषणेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपशब्द वापरले. त्यावेळी प्रियांका गांधी यांनी मुलांना शांत राहण्यास सांगितले. शिवाय, अशा प्रकारची घोषणाबाजी अयोग्य असल्याचं प्रियांका गांधी यांनी मुलांना सांगितले. चौकीदर चोर है! ही घोषणा ठिक आहे. पण, अपशब्द वापरू नका. चांगली मुलं बना असा मोलाचा सल्ला यावेळी प्रियांका गांधी यांनी मुलांना दिला. सध्या समाजमाध्यमांवर या व्हिडीओची चर्चा जोरात सुरू आहे.


‘पुलवामा हल्ला हा भाजपचा कट’; गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप




'भाजपनं आपच्या 7 आमदारांना दिली 10-10 कोटींची ऑफर'


राहुल गांधींचा आरोप

राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. आपल्या जाहीर सभांमधून देखील राहुल गांधी चौकीदार चोर है! अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवताना दिसत आहेत. या घोषणेकरता त्यांनी सर्वाच्च न्यायालयाचा हवाला दिल्यानं न्यायालयानं त्यांना नोटीस देखील पाठवली आहे. यावर त्यांनी न्यायालयाकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. अनावधनानं न्यायालयाचा हवाला दिल्याचं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.


SPECIAL REPORT : मोदींविरोधात लढण्याआधीच माजी सैनिक हरला!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 10:16 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...