News18 Lokmat

या निवडणुकीत नरेंद्र मोदी याचं 'नाव' आहे आणि कामही आगे - योगी

'सपाच्या राजवटीत भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीने कळस गाठला होता. जनता नाराज होती.'

News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2019 11:41 PM IST

या निवडणुकीत नरेंद्र मोदी याचं 'नाव' आहे आणि कामही आगे - योगी

लखनऊ 30 एप्रिल : लोकसभेच्या निवडणुकीत सर्वांचं लक्ष लागलंय ते उत्तर प्रदेशाकडे. कारण सर्वात जास्त 80 जागा या उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे तिथे भाजपची कामगीरी कशी राहील याकडे सगळ्यांच लक्ष आहे. उत्तर प्रदेशात 2014 सारखीच दमदार कामगीरी करू असा विश्वास उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलाय. CNN News18ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी हा विश्वास व्यक्त केला.Loading...

उत्तर प्रदेशात भाजपने 2014मध्ये तब्बल 73 जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे 2019मध्ये काय होणार असा प्रश्न विचारला जातोय. दिल्लीचा मार्ग हा उत्तर प्रदेशातूनच जातो असंही म्हटलं जातं. त्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहुजन समाज पक्ष आणि समाजवादी पक्षाची आघाडी झाल्याने भाजपला फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.योगी आदित्यनाथ यांनी मात्र या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले, 2014 मध्ये फक्त मोदींचं नाव होतं. आता नाव आणि काम दोनही आहे. उत्तर प्रदेशात आम्ही विकासाची कामं उभं केलीत. गुन्हेगारीला आळा घातला. प्रत्येक गावात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरं बांधून दिली. उसाचे पैसे शेतकऱ्यांना दिले अशी अनेक कामे केली त्यामुळे लोकांचा आमच्या कामावर विश्वास आहे असंही त्यांनी सांगितलं.समाजवादी पक्षाने गेली पाच वर्ष विकासाची कुठलीही काम केली नाहीत. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीने कळस गाठला होता. जनता नाराज होती अशा पार्श्वभूमीवर भाजप सरकारने उत्तम कामगीरी केली असा दावाही त्यांनी केला. मोदी हटाओ शिवाय सरकारकडे कुठलाही कार्यक्रम नाही अशी टीकाही त्यांनी केली.

अक्षरमंत्र : 'अक्षरमंत्र'चे सर्व भाग आता एका 'क्लिक'वर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2019 11:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...