मोदी पंतप्रधान झाले तर विरोधकांची दुकानं बंद होणार - योगी आदित्यनाथ

देशातले विरोधी पक्ष फक्त मोदींना शिव्या देण्याचं काम करत आहेत. मोदींना असं कुठलं काम केलं तुम्ही मोदींना शिव्या देता?

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 07:48 PM IST

मोदी पंतप्रधान झाले तर विरोधकांची दुकानं बंद होणार - योगी आदित्यनाथ

लखनऊ 10 मे : विरोधी पक्ष फक्त आपलं अस्तित्व वाचविण्यासाठी एकत्र येत आहेत. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील आणि विरोधी पक्षांची दुकानं कायमची बंद होतील अशी टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलीय. आपलं राजकारण संपून जाईल अशी भीती असल्यानेच ते मोदींना विरोध करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

आदित्यनाथ म्हणाले, देश बनाओ अशी भाजपची घोषणा आहे. तर मोदी हटोओ अशी विरोधी पक्षांची घोषणा आहे. कसेही करून त्यांना मोदींना हटवायचं आहे. याचं कारण म्हणजे सगळ्या नेत्यांना भीती आहे की त्यांची भ्रष्टाचाराची कुरणं बंद होतील. लालूप्रसाद यादव जसे जेलमध्ये गेले तसेच आपणही जेलमध्ये जावू अशी भीती त्यांना वाटते असंही ते म्हणाले.

देशातले विरोधी पक्ष फक्त मोदींना शिव्या देण्याचं काम करत आहेत. मोदींना असं कुठलं काम केलं तुम्ही मोदींना शिव्या देतात असा सवालही त्यांनी केला. काँग्रेसच्या धोरणांमुळेच राम मंदिराच्या बांधकामाला उशीर झाला अशी टीकाही त्यांनी केली.

लोकसभेच्या निवडणुकांच्या पाच टप्प्यांचं मतदान झालं असून उत्तर प्रदेशात राहिलेल्या दोनही टप्प्यात मतदान होणार आहे. लोकसभेच्या सर्वाधिक 80 जागा उत्तर प्रदेशात आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी प्रचंड जोर  लावला आहे.

मोदींना कौटुंबीक मुल्यांचं महत्त्व नाही

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींवर टीका केल्यानंतर काँग्रेसचे सर्व नेते मोदींवर तुटून पडले आहेत. राजीव गांधी कुटुंबासह INS विराट या युद्धनौकेवर सहलीसाठी गेले होते असा आरोप मोदींनी केला होता. त्यावरून काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी मोदींवर टीका केलीय. मोदींना कुटुंब नसल्यामुळे त्याचं महत्त्व नाही आणि मुल्यांची जाणही नाही असं शर्मा यांनी सांगितलं. शर्मांच्या या विधानामुळे वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

आनंद शर्मा म्हणाले, मोदींना कुटुंब असतं तर तेही आपल्या कुटुंबाला घेऊन दौऱ्यावर गेले असते. मात्र त्यांना कुटुंबच नसल्यामुळे घर काय असतं हे त्यांना माहितच नाही. कुटुंब नसल्यामुळे कौटुंबिक मुल्यांविषयी आदरही नाही असंही त्यांनी मोदींना सुनावलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 10, 2019 07:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...