नरेंद्र मोदींना अशी मिठाई खाऊ घालणार की त्यांचे दातच तुटले पाहिजेत - ममता बॅनर्जी

'मिठाई करताना त्यात सुकामेवा टाकला जातो. पण मोदींना जी मिठाई दिली जाईल ती मातीने बनविलेली आणि त्यात दगड आणि वीटा असतील'

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 06:21 PM IST

नरेंद्र मोदींना अशी मिठाई खाऊ घालणार की त्यांचे दातच तुटले पाहिजेत - ममता बॅनर्जी

कोलकता 26 एप्रिल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी राजकीय लढाई असली तरी वयक्तिक संबंध चांगले आहेत. ममता दीदी दरवर्षी आपल्याला मिठाई पाठवतात असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं होतं. अभिनेता अक्षय कुमार यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिल्यानंतर त्याची जोरदार चर्चा झाली. पंतप्रधानांच्या या वक्तव्यानंतर ममता बॅनर्जी यांनी त्याला आक्रमपणे उत्तर दिलंय.

बालुरघाट आणि गंगारामपूर इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्या म्हणाल्या, दिल्लीचा लाडू जो खाणार त्याला पश्चाताप करावा लागेल. मोदींना यावेळी असा रसगुल्ला खाऊ घालणार की त्यांचे दातच तुटले पाहिजे असं त्या म्हणाल्या.

मिठाई करताना त्यात सुकामेवा टाकला जातो. पण मोदींना जी मिठाई दिली जाईल ती मातीने बनविलेली आणि त्यात दगड आणि वीटा असतील असंही त्यांनी सांगितलं. लोकसभा निवडणुकीत भाजपला 100 जागाही मिळणार नाहीत असंही ते म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये भाजपला 2014 मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यांना मोठा रसगुल्ला म्हणजे भोपळा मिळेल अशी टीकाही त्यांनी केला.

भाजपला काहीच मिळणार नाही

या लोकसभा निवडणुकीत अवघ्या देशाचं लक्ष पश्चिम बंगालवर लागलं आहे. भाजपला या राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकायच्या आहेत. पण आपण एकाही जागेवर हरणार नाही, असं ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे. नेटवर्क 18ला यांनी त्यांची खास मुलाखत घेतली. त्यात त्या बोलत होत्या. पश्चिम बंगालमध्ये भाजप हा त्यांचा सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे ही बाब ममतांनी फेटाळून लावली. भाजपला हरवून आम्ही सगळ्या जागा जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आपण पश्चिम बंगालमध्ये 23 पेक्षा जास्त जागा जिंकू, असं म्हटलं होतं. त्यावर ममतांनी हे उत्तर दिलं आहे.'भाजप स्वप्नं बघतंय' भाजपने पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 2 जागा मिळवल्या. विधानसभेत भाजपच्या फक्त 3 जागा आहेत. असं असताना भाजपला सगळ्यात मोठा विरोधक कसं काय मानणार, असा सवाल त्यांनी विचारला.

भाजपकडे व्हिजन नाही

भाजप स्वप्नं बघत असेल तर त्यांचं स्वागत आहे पण वस्तुस्थिती वेगळी आहे. लोकांशी खोटं बोलून भाजप त्यांना फसवत आहे, भाजपकडे कोणतंही व्हिजन नाही, असाही आरोप त्यांनी केला.

बंगाल आणि उ. प्रदेश ठरवणार पंतप्रधान

बंगाल आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांची सरकार बनवण्यात महत्त्वाची भूमिका आहे. त्यासोबतच आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या राज्यात भाजपला एक जागा जिंकणंही कठीण होईल, असा दावा त्यांनी केला. पंजाब, दिल्ली या राज्यात भाजप जिंकणं कठीण आहे. राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही भाजपची मतं कमी होतील. अशा स्थितीत ते कुठून संख्याबळ आणणार, असं त्यांनी विचारलं.

पश्चिम बंगालमध्ये चांगलं यश मिळालं तर तुम्ही कुणाला पाठिंबा देणार, असं ममतांना विचारलं तेव्हा आम्ही सगळे मिळून निर्णय घेऊ, असं त्या म्हणाल्या. आमचा पक्ष सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हा निर्णय मी एकटीने घेऊ शकत नाही, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 06:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close