भाजपला मत दिलं म्हणून पत्नीची फावड्यानं हत्या

भाजपला मत दिलं म्हणून पत्नीची फावड्यानं हत्या

पत्नीनं भाजपला मत दिलं म्हणून पतीनं तिची हत्या केली.

  • Share this:

लखनऊ, 21 मे : भाजपला मत दिलं म्हणून उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथील तरूणानं फावड्यानं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. रामबचन असं या तरूणाचं नाव आहे. तर, नीलम असं त्याच्या पत्नीचं नाव आहे. याप्रकरणात पत्नीच्या माहरेच्या लोकांनी हुंडा न दिल्यानं हत्या झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी देखील आरोपीला अटक केली आहे. गाजीपूरमधील तरवनिया गावात हत्येचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पती - पत्नीमध्ये मत कुणाला द्यायचं यावरून वाद झाला. पती बसपालं मत दिलं पाहिजे या मताचा होता. तर, पत्नीला भाजपला मत द्यायचं होतं. पतीच्या सांगण्यावरून देखील नीलमनं भाजपला मत दिलं. त्यानंतर रागानं लाल झालेल्या पतीनं फावड्यानं पत्नीची हत्या केली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हत्या केल्यानंतर रामबचन तिथेच उभा झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर गर्दी गोळा झाली. त्यानंतर रामबचन तिथून निघून गेला.

घटनास्थळी नीलमच्या माहेरची लोकं देखील पोहोचली. त्यांनी वाहतुकीला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी उचललेल्या पावलांमुळे वाहतुक कोंडी झाली नाही. त्यानंतर त्यांनी रामबचनसह आई-वडिलांविरोधात हुंड्यांचा गुन्हा दाखल केला.


SPECIAL REPORT: पवारांना मोठा धक्का, मावळमध्ये पार्थचा मार्ग खडतर?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 09:29 AM IST

ताज्या बातम्या