'वाराणसीत नरेंद्र मोदींविरुद्ध लढण्याची हिंमत प्रियंका गांधींनी दाखवली नाही'

'वाराणसीत नरेंद्र मोदींविरुद्ध लढण्याची हिंमत प्रियंका गांधींनी दाखवली नाही'

'कुणी कुठून लढावं हे इतर कुठल्याही पक्षाने आम्हाला सांगू नये'

  • Share this:

नवी दिल्ली 26 एप्रिल :  माजी आमदार अजय राय यांना वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध उमेदवारी दिल्याने काँग्रेसवर टीका होतेय. 2014मध्ये अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीत मोदींविरुद्ध लढण्याची हिंमत दाखवली होती. 2019 मध्ये काँग्रेसला ती संधी होती मात्र काँग्रेसने ती हिंमत दाखवली नाही अशी टीका आपचे प्रवक्ते अक्षय मराठे यांनी CNNnews18च्या कार्यक्रमात बोलताना केली.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढू शकतात अशी शक्यता काँग्रेसकडूनच व्यक्त केली जात होती. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तसे संकेत दिले होते. तर राहुल यांनी आदेश दिले तर मी कुठूनही लढायला तयार आहे असं वक्तव्य प्रियंका गांधी यांनीही केलं होतं. त्यामुळे वाराणसीत उभं राहून प्रियंका या मोदींना चेकमेट देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसने ती जोखीम घेतली नाही.

सर्व देशात भाजपविरुद्ध वातावरण असताना काँग्रसने उत्तर प्रदेशात कच खाल्ली. प्रियंका वाराणसीतून लढल्या असत्या तर देशाचं लक्ष वेधलं गेलं असतं असं मतही मराठे यांनी व्यक्त केलं. तर काँग्रेससारखा मोठा पक्ष हा खूप दूरचा विचार करतो. फक्त लढणं हे काही उद्दीष्ट असू शकत नाही असं मत काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी व्यक्त केलं.

त्या म्हणाल्या, काँग्रेसने काय करावं हे आप आम्हाला सांगू शकत नाही. 2015मध्ये काँग्रसच्या पाठिंब्यानेच आप सत्तेत आलं होतं. दिल्लीत काँग्रेसला आपसोबत आघाडी करायची होती मात्र 'आप'ने मान्य होणार नाहीत अशा अटी टाकल्या. त्यांना दिल्लीसोबतच हरियाणा आणि पंजाबमध्येही युती करायची होती मात्र काँग्रेसला ते शक्य नव्हतं.

काँग्रेसची फक्त घोषणा

गेल्या म्हणजेच 2014च्या लोकसभा निवडणुकीत लाट असताना देखील केजरीवालांनी तेथे दिड लाख मते मिळवली होती. ज्या प्रमाणे राहुल गांधी यांना भाजपने अमेठीमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच प्रमाणे मोदींना वाराणसीमध्ये घेरण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे असं बोललं जात होतं. अर्थात यासंदर्भात अंतिम निर्णय झालेला नाही.

वाराणसीतून प्रियांका गांधी यांच्या नावाची घोषणा करण्याआधी काँग्रेस समाजवादी पक्ष आणि बसपा यांच्याशी चर्चा करेल. या दोन्ही पक्षांकडून काँग्रेस पाठिंबा मागू शकते असंही बोललं जात होतं. फेब्रुवारी महिन्यात जेव्हा काँग्रेसने प्रियांका गांधी यांना सक्रिय राजकारणात उतरवले होते तेव्हापासून वाराणसीमधील काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांनी येथून निवडणूक लढवावी अशी मागणी करत होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 07:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading