VIDEO निवडणुकीच्या प्रचारातच नरेंद्र मोदींना 'जात' का आठवते?

VIDEO निवडणुकीच्या प्रचारातच नरेंद्र मोदींना 'जात' का आठवते?

राहुल गांधींना आपण जानवेधारी ब्राम्हण असल्याचं का सांगावं लागलं?

  • Share this:

पटना 03 मे : निवडणुकीचा प्रचार सुरु झाल्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात का आठवते असा सवाल काँग्रेसने केला आहे. गेली  पाच वर्ष मोदींना जातीची कधी आठवण आली नाही मात्र केवळ मतं मागण्यासाठी त्यांनी आपल्या जातीची प्रचारात आठवण काढली अशी टीकाही काँग्रेसने केली. उत्तर भारतात मोदी मॅजिक चालणार का? या विषयावर न्यूज18 इंडियाने आज पाटण्यातू आर पार हा खास शो केला. त्यात विविध पक्षांच्या नेत्यांनी सहभाग घेतला.

बिहारमध्ये या निवडणुकीत रोजदार लढत होत आहेत. नितीश कुमार यांचा जेडीयू, भाजप आणि इतर छोटे पक्ष मिळून NDA तर काँग्रेस आणि राजद यांची आघाडी तर काही जागांवर कम्युनिष्ट पक्ष असा हा सामना रंगत आहे. त्यामुळे यावेळी बिहारचा कौल कुणाकडे असणार याची उत्सुकता आहे.

याही वेळी सर्व 40 जागा NDA जिंकणार असल्याचा दावा भाजप आणि जेडीयूकडून करण्यात येतोय तर काँग्रेस आणि राजद आघाडी यावेळी NDAला पाणी पाजणार असा दावा आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.

नरेंद्र मोदी सरकारने विकासकामे केली नसल्यानेच त्यांना जातीचा आधार घ्यावा लागतोय. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही त्यामुळे जातीचं पंतप्रधान भांडवल करत असल्याची टीकाही करण्यात येतेय.

तर राहुल गांधींनी आपण जानवेधारी ब्राम्हण असल्याचं का सांगितलं असा दावा जेडीयूचे प्रवक्ते अजय अलोक यांनी केलाय. स्वत:चा धर्म त्यांना का सांगावा लागला, राहुल गांधी हे ब्राम्हण आहेत का असा सवालही त्यांनी केला.

बिहारमधल्या काही जागांवर डावे पक्षही लढत आहेत.

बेगुसरायमधून कन्हैय्या कुमार याला काँग्रेस आणि राजदने पाठिंबा द्यावा अशी मागणी होत होती. मात्र राजदने त्याला पाठिंबा दिला नाही. त्यामुळे तिथे तिहेरी लढत होत आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपला बिहारमध्ये घसघशीत यश मिळालं होतं. तेवढ्या जागा कायम राखणं हे भाजप समोरचं आव्हान असणार आहे.

First published: May 3, 2019, 8:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading