तरुणांना नरेंद्र मोदी का करत आहेत मतदानाचं आवाहन, ही आहेत कारणं

लोकसभा निवडणुकीत 7 कोटी 60 लाख नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Apr 12, 2019 08:30 PM IST

तरुणांना नरेंद्र मोदी का करत आहेत मतदानाचं आवाहन, ही आहेत कारणं

मुंबई 12 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा मतदान करणाऱ्या नवमतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत आहेत. याची चर्चाही सोशल मीडियावर जोरदार होत आहे. या नवमतदाराला आपल्याकडे वळवण्याचा पंतप्रधानांचा हा प्रयत्न आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 7 कोटी 60 लाख नवमतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पंतप्रधानांच्या या आवाहनाला तरुण किती प्रतिसाद देतात हे 23 मे नंतर कळणार आहे.

आक्रम नेत्याची प्रतिमा

राष्ट्रवाद, खंबीर नेता, आक्रमकपणा अशी नरेंद्र मोदी यांची प्रतिमा आहे. तरुण हे कायम अशा नेत्याला पसंत करत असतात. या प्रतिमेचा फायदा घेत तरुण मतदारांना आकर्षीत करण्याचा मोदींचा प्रयत्न आहे. 2014 च्या निवडणुकीत तरुणांनी मोदींना प्रचंड मतं दिली होती. त्याचा फायदा भाजपला झाला. दहा वर्षाच्या काँग्रेसच्या राजवटीला कंटाळलेल्या तरुणांनी मोदींच्या आक्रमक स्टाईलला पसंती दिल्याचं दिली होती. गेल्या पाच वर्षात परिस्थिती बदलल्याने अपेक्षांचं ओझं नरेंद्र मोदींना अडचणीचं ठरू शकतं.

राष्ट्रवादाचा परिणाम

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर मोदींची आक्रमक प्रतिमा आणखी उजळली गेली. पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे अशी नागरिकांची इच्छा होती. त्यानंतर भारताने धडक कारवाई केली. त्याआधीही सर्जिकल स्ट्राईक करून भारताने पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. याचा राजकीय लाभ घेण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप सर्वच राजकीय पक्षांनी केलाय.

Loading...

पाकिस्तान

पंतप्रधानही आपल्या भाषणाचा रोख त्याच मुद्यांवर ठेवत आहेत. त्यांच्या प्रत्येक भाषणात वीर जवान, हवाई हल्ले, सर्जिकल स्ट्राईक, पाकिस्तान असे मुद्दे कायम असतात. हे मुद्दे तरुणांना आकर्षीत करणारे आहेत. हा वर्ग मतदानाला बाहेर पडला तर त्याचा फायदा मिळण्याची शक्यता मोदींना वाटते त्याच बरोबर मुळ मुद्यांवरून त्यांचं लक्षही विचलित होते असं राजकीय निरिक्षकांचं मत आहे.

बेरोजगारीचं काय?

2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी जी मोठी आश्वासन दिली होती त्याबद्दल आता त्यांच्याकडे विचारणा होत आहे. बाहेर आलेल्या आकडेवारीनुसार रोजगारांच्या संधीं घटल्या असंही स्पष्ट झालंय. नोटबंदी आणि जीएसटीमुळे छोट्या उद्योगांना फटका बसला. या मुद्यांवरचं लक्ष विचलीत करण्याठीच मोदी राष्ट्रवाद आणि सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत असल्याचं मतही राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर कायम सक्रिय असणारे पंतप्रधान तरुणांना आकर्षीत करू शकतील का हे 23 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 12, 2019 08:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...