सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी सट्टा बाजारात बदलले अंदाज; भाजपला येणार अच्छे दिन?

सहाव्या टप्प्यातील मतदानापूर्वी सट्टा बाजारात बदलले अंदाज; भाजपला येणार अच्छे दिन?

लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार? यावर आता सट्टा बाजारात देखील अंदाज वर्तवले जात आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : देशात सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे आत्तापर्यंत पाच टप्प्यातील मतदान पार पडले आहे. तर, रविवारी 12 मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान पार पडणार असून 19 मे रोजी शेवटच्या अर्थात सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यानंतर सर्वाचं लक्ष असणार आहे ते 23 मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे! निवडणुकीच्या या माहोलमध्ये सध्या सर्वत्र सत्ता स्थापन कोण करणार? नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? NDA, UPAला किती जागा मिळणार? काँग्रेस की भाजप बाजी मारणार? यावर सध्या जोरात चर्चा सुरू आहेत. त्यावर आता सट्टाबाजारात देखील खल सुरू झाला आहे. राजस्थानमधील फलौदी, मध्य प्रदेशातील नीमच आणि गुजरातमधील सुरत येथे सट्टा बाजारात यावर चर्चा सुरू झाली आहे. सट्टा बाजारात भाजप किती जागा जिंकणार? यावर चर्चा सुरू आहे.

मोदी पंतप्रधान झाले तर विरोधकांची दुकानं बंद होणार - योगी आदित्यनाथ

काय आहे सट्टा बाजाराचा अंदाज

मध्य प्रदेशातील नीमच सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजपला 247 ते 250 आणि काँग्रेसला 77 ते 79 जागा मिळण्याचा अंदाज आहे. राजस्थानमधील फलौदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजपला 240 ते 245 जागा मिळण्याचा अंदाज असून NDAला 320 ते 325 जागा मिळतील असा अंदाज आहे. फलौदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार राजस्थानमध्ये भाजपला 21 ते 22 जागा मिळतील असा अंदाज आहे. तर, राज्यात सत्ता असलेल्या काँग्रेसला केवळ 3 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

या मुस्लीम देशाच्या नोटेवर का आहे गणपतीचा फोटो?

सुरतचा सट्टा बाजाराचा अंदाज काय?

सुरत सट्टा बाजारामध्ये देखील काही वेगळी स्थिती नाही. सुरत सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार भाजपला 246 ते 248 जागा मिळतील. तर, काँग्रेसला 78 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, गुजरातमध्ये भाजपला 22 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2014मध्ये भाजपनं या ठिकाणी सर्वच्या सर्व म्हणजेच 26 जागा जिंकल्या होत्या ही बाब महत्त्वाची.

हीआकडेवारी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ती आकडेवारी न्यूज18नं वाचकांसमोर मांडली आहे. या आकडेवारीचा न्यूज18 सोबत काहाही संबंध नाही.

SPECIAL REPORT: राजीव गांधींच्या 'विराट' सहलीचा गौप्यस्फोट, मोदींच्या आरोपातलं सत्य काय?

First published: May 10, 2019, 9:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading