भाजपला घरचा आहेर; मोदीजी की सेना बोलणारे 'देशद्रोही'

भाजपला घरचा आहेर; मोदीजी की सेना बोलणारे 'देशद्रोही'

योगी आदित्यनाथ यांच्या मोदीजी की सेना या वक्तव्यावरून आता भाजपला घरचा आहेर मिळाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 05 एप्रिल : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 'मोदीजी की सेना' असा लष्कराचा उल्लेख केल्यानंतर त्यांच्यावर चौफेर टीका करण्यात आली. निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस देखील पाठवली. पण, योगी यांच्या या वक्तव्यावर आता भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. 'मोदीजी की सेना' असा उल्लेख करणारे 'देशद्रोही' असल्याची टीका माजी लष्करप्रमुख आणि माजी केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केली आहे. व्हि. के. सिंग यांचं हे विधान म्हणजे भाजपला घरचा आहेर आहे. देशाच्या सैन्याला मोदी की सेना बोलणं चुकीचं आहे. ती देशाशी गद्दारी असल्याचं व्हि. के. सिंग यांनी म्हटल्याची माहिती बीबीसीनं दिली आहे. सेना ही देशाची आहे. ती कोणत्याही देशाची नाही असं देखील व्हि. के. सिंग यांनी स्पष्ट केलं.

योगी आदित्यनाथ यांना नोटीस

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. योगी आदित्यनाथ यांनी भारतीय सेनेचा उल्लेख 'मोदी की सेना' असा केला होता. या वक्तव्याची दखल घेत निवडणूक आयोगाने ही नोटीस पाठवली आहे. ही नोटीस आचारसंहितेच्या अंतर्गत देण्यात आलेली नाही. तर निवडणूक आयोगाने याआधीच राजकीय पक्षांना सांगितलं होतं की, 'प्रचारादरम्यान भारतीय लष्कराचा वापर करण्यात येऊ नये.' याच सूचनेचं पालन न केल्याबद्दल योगींना आयोगाने ही नोटीस पाठवली आहे.

दरम्यान, भडकाऊ वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एका वादग्रस्त वक्तव्य केलं. 'युपीएच्या काळात काँग्रेस दहशतवाद्यांना बिर्याणी देत होते तर मोदींची सेना दहशतवाद्यांना गोळ्या घालते,' असं वक्तव्य योगी यांनी केलं. गाझियाबाद इथं झालेल्या एका प्रचार सभेत ते बोलत होते.

काँग्रेसचे नेते मसूद अझहरला जी लावतात यावरून काँग्रेसची मानसिकता दिसून येते अशी टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली होती. योगींनी भारतीय सेनेला मोदींची सेना असं म्हटल्याने त्यांच्यावर सोशल मीडियातून जोरदार टीका होत आहे.

SPECIAL REPORT : सोलापुरात शिंदेंची वाट बिकट, नरसय्या आडमांचा आंबेडकरांना पाठिंबा

First published: April 5, 2019, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading