निकालाआधीचा एक्झिट पोल म्हणजे काय, कशी जाहीर होते आकडेवारी? जाणून घ्या

निकालाआधीचा एक्झिट पोल म्हणजे काय, कशी जाहीर होते आकडेवारी? जाणून घ्या

जाणून घेऊयात काय असतो एक्झिट पोल आणि एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येणारी आकडेवारी येतात तरी कसे....

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मे: देशात 17व्या लोकसभेसाठी मतदान प्रक्रिया सुरु आहे. यंदा सात टप्प्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत 6 टप्पे पार पडले आहेत. 19 तारखेला सातव्या आणि अखेरच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. त्यानंतर 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. देशात नवे सरकार कोणाचे असेल पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार की अन्य कोणी असेल याचा निर्णय 23 तारखेला होईल. देशाची जनता ठरवेल की कोण आहेत 543 जण ज्यांना लोकसभेवर पाठवले जाणार आहे.

अर्थात 23 तारखेला कोणाचा पराभव होणार आणि कोणाचा विजय निवडणूक आयोग सांगेलच. पण त्याआधी निकालासंदर्भात अनेक अंदाज व्यक्त करत आहेत. तर काही जण भविष्यवाणी करत आहेत. या शिवाय अन्य एक मार्ग आहे ज्याच्या आधारे निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो. निकालाविषयी देशातील जनतेला इतकी उत्सुकता असेत की कोणत्या ना कोणत्या मार्गातून ते कोणाचा विजय होईल याची माहिती घेत असतात. यातूनच एक मार्ग निघाला तो म्हणजे एक्झिट पोल होय. 19 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल जाहीर होतील.

निवडणूक जाहीर झाल्यापासून सोशल मीडियावर जय-पराभवाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक ओपिनियम पोल आणि काही सर्व्हे देखील जाहीर झाले आहेत. पण निकालाच्या सर्वात जवळ जाणारा एक्झिट पोल असतो. या पोलच्या माध्यमातून देशात कोणत्या पक्षाची हवा आहे. कोणता पक्ष निकालात बाजी मारू शकतो याचा अंदाज येतो. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सर्वांना उत्सुकता असते ती एक्झिट पोल काय सांगतो याची. तर जाणून घेऊयात काय असतो एक्झिट पोल आणि एक्झिट पोलमध्ये सांगण्यात येणारी आकडेवारी येतात तरी कसे....

काय असतो एक्झिट पोल ?

एक्झिट पोल हा नेहमी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतील शेवटच्या मतदानानंतर जाहीर केला जातो. ज्या दिवशी मतदान होते त्या दिवशी माहिती गोळा केली जाते. जेव्हा मतदार मत देऊन बाहेर येतो तेव्हा त्याला विचारले जाते कोणाला मत दिले. या उत्तराच्या आधारावर जो सर्व्हे केला जातो त्यातून संबंधित मतदारसंघातील निकालाचा अंदाज व्यक्त केला जातो त्यालाच एक्झिट पोल असे म्हणतात. सर्वसाधारण वृत्तवाहिन्यांवर एक्झिट पोल मतदानाच्या शेवटच्या टप्प्यातच दाखवला जातो. भारतात देखील एक्झिट पोल मतदान झाल्यानंतरच दाखवण्यास परवानगी आहे. एक्झिट पोल सोबत अनेक वेळा ओपिनियन पोलचा देखील समावेश असतो.

भारतात 7व्या टप्प्यानंतर म्हणजेच 19 मे रोजी एक्झिट पोल संध्याकाळी 6 वाजल्यानंतर जाहीर केले जातील.

कोणी सुरु केला होता एक्झिट पोल

एक्झिट पोलची सुरूवात करण्याचे श्रेय नेदरलँडमधील समाजशास्त्र आणि माजी राजकीय नेता मार्सेल वॉन डॅम यांना जाते. डॉम यांनी 15 फेब्रुवारी 1967 रोजी याचा पहिल्यांदा वापर केला होता. तेव्हा नेदरलँडमधील निवडणुकीचा अचूक अंदाज त्यांनी एक्झिट पोलच्या माध्यमातून काढला होता. भारतात एक्झिट पोलची सुरूवात इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ पब्लिक ओपिनियनचे प्रमुख एरिक डी कोस्टा यांनी केली. निवडणुकीच्या काळात एक्झिट पोलचा वापर करून निकालाचा अंदाज व्यक्त करणारे ते पहिले व्यक्ती होते.

First published: May 15, 2019, 2:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading