लोकसभा 2019 : बंगाली मातीत कमळ की गवतफूल... कोण जास्त बहरणार?

लोकसभा 2019 : बंगाली मातीत कमळ की गवतफूल... कोण जास्त बहरणार?

बंगाली राजकारणात ऐतिहासिक ठरू शकेल अशी 2019 ची लोकसभेची निवडणूक या राज्याबरोबर देशाचा कौलही ठरवेल असं म्हटलं जातंय.

  • Share this:

कोलकाता, 13 मे : बंगाली राजकारणात ऐतिहासिक ठरू शकेल अशी 2019 ची लोकसभेची निवडणूक या राज्याबरोबर देशाचा कौलही ठरवेल असं म्हटलं जातंय. बंगाली जनतेवर अनेक वर्षं राज्य करणारी डावी आघाडी उलथून टाकत ममता बॅनर्जींनी या राज्यावर चांगला जम बसवला असतानाच आता भाजपचा वारू हळूहळू बंगाल काबीज करू पाहतोय. भाजप आणि तृणमूल काँग्रेस दोन्ही पक्ष या निवडणुकीत आधी नव्हते एवढे आक्रमक झालेले दिसले. ममता विरुद्ध मोदी असा सामना पश्चिम बंगालमध्ये रंगतो आहे.

लोकसभेसाठी बंगाली जनतेने विक्रमी मतदान केलं आहे. तृणमूल आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटनांनंतरही हे मतदानाचं प्रमाण वाढलं आहे.

पश्चिम बंगाल लोकसभेच्या जागांच्या दृष्टीने देशातलं तिसरं मोठं राज्य आहे. लोकसभेच्या 42 जागा इथे आहेत. उत्तर प्रदेशात 80 जागा तर महाराष्ट्रात 48 लोकसभा सीट्स आहेत. त्या खालोखाल पश्चिम बंगालचा नंबर येतो.

मा, माटी, मानुष असं सांगत डाव्यांना धूर चारणाऱ्या ममता बॅनर्जी जवळपास दशकभरापासून बंगालवर प्रभुत्व गाजवत आहेत. त्यांच्यासाठी ही निवडणूक एक मोठा मैलाचा दगड ठरणारी असेल.

2014 मध्ये तृणमूल काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व गाजवत 42पैकी 34 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 4, भाजपला 2 तर डाव्या आघाडीला 2 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. पण भाजपला जागा कमी मिळाल्या असल्या तरी आश्चर्यकारकरीत्या काँग्रेसपेक्षा जास्त मतं मिळाली होती. मतांची टक्केवारी गृहित धरली तर भाजप तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. चार जागा मिळवूनसुद्धा काँग्रेस वोट शेअरमध्ये चौथ्या क्रमांकावर होता, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची डावी आघाडी दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळवूनही 2 जागीच विजयी होऊ शकली होती.

गुजरात लोकसभा : मतदान वाढवणारी गुजराती जनता यंदा मोदींना 'हात' देणार की दाखवणार?

राजस्थान लोकसभा : भाजपला पैकीच्या पैकी गुण देणाऱ्या या राज्यात पारडं फिरणार का?

भाजपचा फोकस शबरीमला आणि तिरुवनंतपूरम; असे आहे केरळमधील लोकसभेचे समीकरण

भाजपला असनसोल आणि दार्जिलिंग या दोन जागांवर यश मिळालं होतं. मालदा दक्षिण, कोलकाता उत्तर आणि कोलकाता दक्षिण या जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना लक्षणीय मतं मिळाली होती. आता पश्चिम बंगालमधल्या किमान अर्ध्या जागा खिशात घालायचं भाजपचं लक्ष्य आहे, तर ममता बॅनर्जींच्या तृणमूलला असलेल्या जागा टिकवून ठेवायचं आव्हान आहे.

--------------------------------------------------------------------

2014 मतविभाजन टक्केवारी (vote share)

पक्ष          जागा  मतांची टक्केवारी

तृणमूल काँग्रेस  34    39.79

डावी आघाडी   02   29.95

भाजप              02    17.2

काँग्रेस              04    9.69

--------------------------------------------------------------------

विधानसभेत दीदी सरस

2014 च्या लोकसभा निवडणुका झाल्यांतर दीड वर्षांत पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुका झाल्या. मोदी लाट ओसरली नसली, तरी त्याचा फायदा भाजपला बंगालमध्ये अजिबात झाला नाही. ममता बॅनर्जींनी 294 पैकी 211 जागा जिंकत आपणच बंगालची राणी असल्याचं सिद्ध केलं. उलट लोकसभेपेक्षा त्यांचा वोट शेअरही वाढला. काँग्रेसला 44 जागा मिळाल्या, तर डाव्या आघाडीला 32 जागा मिळाल्या. भाजपला विधानसभेत केवळ 3 जागा मिळाल्या गोरखा जनमुक्ती मोर्चा या स्थानिक पक्षाबरोबर भाजपने आघाडी केली होती. भाजप आघाडीला 6 जागा मिळाल्या. काँग्रेस आणि डाव्या आघाडीने एकत्र यायचं ठरवूनसुद्धा ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचं पारडं चांगलंच जड राहिलं.

उन्नीस मे हाफ, इक्कीस मे पूरा साफ

2019 ची निवडणूक बंगाली राजकारणात महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या वेळी थेट लढत ममता विरुद्ध मोदी अशी आहे. या राज्यावर दीर्घकाळ डाव्यांनी राज्य केलं. त्यांचं वर्चस्व मोडित काढत ममता बॅनर्जींनी सत्तापालट केला. काँग्रेस नेहमीच या राज्यात मोठा पक्ष राहिला आहे. पण या वर्षी पहिल्यांदाच राज्यातले हे दोन्ही मोठे पक्ष अस्तित्वाचा लढा देत आहेत. ओपिनियन पोलनुसार तृणमूल काँग्रेस सगळ्यांत चांगल्या परिस्थितीत आहे, तर भाजप या राज्यात मुसंडी मारणार अशी चिन्हं आहेत. भाजपने निम्म्या जागांचं लक्ष्य ठेवलं आहे. उन्नीस में हाफ, इक्कीस में पूरा साफ अर्थात 2019 मध्ये 20- 22 जागांचं भाजपचं लक्ष्य आहे. तर 2021 च्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात सत्ता स्थापन करण्याचं लक्ष्य असल्याचं भाजपचे सचिव सुनील देवधर यांनी एका मुलाखतीत सांगितलं. देवधर यांच्याकडे पश्चिम बंगालच्या शेवटच्या टप्प्यातल्या जागांची जबाबदारी देण्यात आली होती.

भाजपला त्रिपुरासारखं यश बंगालमध्ये मिळवून देणार का 'हा' मराठी माणूस?

ममता बॅनर्जींचं अमित शहांना 'टशन'; रॅलीची परवानगी केली रद्द

या शेवटच्या टप्प्यांत कोलकात्याचे चार मतदारसंघ मोडतात. हेच भाजपनं आपलं लक्ष्य ठेवलं होतं. पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान झालेला हिंसाचार हा चिंतेचा विषय ठरला. तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात काही जणांना प्राणही गमवावे लागले. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते या निवडणुकीत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

EXCLUSIVE VIDEO मोदी मोदी घोषणा देणाऱ्यांना पाहून प्रियांका भर रस्त्यात गाडीतून उतरल्या आणि...

First published: May 13, 2019, 8:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading