तृणमूल आणि डावे एकमेकांना भिडले; मतदान केंद्रावर कब्जा केल्याचा आरोप

तृणमूल आणि डावे एकमेकांना भिडले; मतदान केंद्रावर कब्जा केल्याचा आरोप

मतदानादरम्यान CPM चे खासदार मोहम्मद सलीम यांच्या गाडीवर दगडफेक झाली. 'तृणमूलच्या काही गुंडांनी हल्ला केल्याचा' आरोप त्यांनी केला.

  • Share this:

कोलकाता, 18 एप्रिल : निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये इस्लामपूर लोकसभा मतदारकेंद्रात तृलमूल काँग्रेस आणि डाव्या आघाडीच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली. दुसऱ्या टप्प्याच्या मतदानादरम्यान सीपीएमचे उमेदवार आणि खासदार मोहम्मद सलीम यांच्या गाडीवर दगडफेक झाली.  'तृणमूलच्या काही गुंडांनी हल्ला केल्याचा' आरोप त्यांनी केला. मतदार केंद्रावर मतदारांना धमकवण्यातही येत होतं, असाही आरोप त्यांनी केला आहे.

यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलं. हाय वे बंद करण्यात आले. इस्लामपूरच्या चोप्रा इथल्या मतदान केंद्राजवळ निदर्शनं करण्यात आली. काही निदर्शकांनी मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्याचे प्रकार झाले, असं वृत्त ANI  ने दिलं आहे. निदर्शकांना हटवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी लाठीमार केला आणि अश्रुधुराची नळकांडी फोडली.

तृणमूल आणि डाव्यांच्या संघर्षात EVM मशीनसुद्धा फोडण्यात आलं.

पश्चिम बंगालमधल्या उत्तर दिनाजपूर भागात रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यांवर सुरक्षा दलाच्या जवानांनी लाठीमार केला.

भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला

एका भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह झाडावर लटकलेल्या अवस्थेत सापडल्याने आसपासच्या मतदान केंद्रांवर त्याचे पडसाद उमटले. पश्चिम बंगालच्या पुरुलिया भागात ही घटना घडली.

देशाच्या काही भागात मतदानाला हिंसाचाराचं गालबोट लागलं, तर काही भागात मतदान केंद्रावर दोन गटांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या.

शिशुपाल साहिस असं मृत व्यक्तीचं नाव असल्याचं पोलिसांनी सांगितलं. स्थानिक भाजप नेत्यांनी दावा केला आहे की, ही व्यक्ती भाजप युवा मोर्चाचं काम करणारी होती.

घटनेची माहिती मिळताच पुरुलियामध्ये मोठ्या संख्येने पोलीसबळ पाठवण्यात आलं. पोलीस पुढील तपास करत आहेत.

यापूर्वी सिलीगुडीला भाजपच्या एका बूथ ऑफिसमध्ये मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. 42 वर्षांच्या इसमाचा मृतदेह दोरीला बांधलेल्या अवस्थेत भाजपच्या स्थानिक कार्यालयात लटकताना दिसला होता. त्यानंतर आता ही घटना पुढे आली आहे.

First Published: Apr 18, 2019 03:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading