बुरहान वाणीच्या गावात शून्य तर, आदिल दारच्या गावात केवळ 15 जणांनी केलं मतदान

बुरहान वाणीच्या गावात शून्य तर, आदिल दारच्या गावात केवळ 15 जणांनी केलं मतदान

पाचव्या टप्प्यामध्ये अनंतनाग आणि पुलवामा येथे खूपच कमी प्रमाणात मतदान झालं.

  • Share this:

07 मे, पुलवामा : सोमवारी जम्मू – काश्मीरमध्ये पाचव्या टप्प्यांतील मतदान पार पडलं. यानंतर राज्यातील सर्व जागांवरील मतदान पार पडलं असून आता प्रतिक्षा आहे ती निकालाची! दरम्यान, बुरहान वाणीच्या गावात एकानंही मतदान केलेलं नाही. तर, पुलवामातील आत्मघातकी दहशतवादी आदिल दार याच्या गावात 15 जणांनी मतदान केलं. शोपियान आणि पुलवामा जिल्ह्यामध्ये केवळ 2.81 टक्के मतदान झाले. जम्मू – काश्नीरमधील मतदानाची 2014च्या तुलनेत केल्यानंतर यंदा मतदान कमी झाल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट होतं.

जम्मू – काश्मीरमधील अनंतनाग हा परिसर अंत्यत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. यावेळी अनंतनागमध्ये झालेलं मतदान हे आजवरचं सर्वात कमी मतदान आहे. तीन वर्षापूर्वी बुरहान वाणीचा खात्मा करण्यात आला असून लोकांनी यंदा मतदानापासून लांब राहणे पसंत केल्याचं दिसून आलं. तर, पुलवामामध्ये केवळ 15 जणांनी मतदान केलं. मतदानादरम्यान ग्रेनेड हल्ला देखील करण्यात आला होता. पण, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं नाही.

या ठिकाणच्या 300 मतदान केंद्रांवर पडलं नाही एकही मत

मतदान घटलं

लडाखमध्ये 63 टक्के मतदान झालं. पहिल्या टप्प्यामध्ये काश्मीरमध्ये मतदानाचा उत्साह पाहायाला मिळाला. पण, त्यानंतर पुढील टप्प्यांमध्ये मात्र लोकांनी मतदानाकडे पाठ फिरवल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं. पहिल्या टप्प्यामध्ये दक्षिण काश्मीरमधील बारामुल्ला येथे 35 टक्के, मध्य काश्मीरमधील श्रीनगर येथे 14 टक्के तर, अनंतनागमध्ये यापूर्वी 13.63 टक्के आणि त्यानंतर कुलगाममध्ये 10.3 टक्के मतदान झाले होते.

शरद पवारांसह सर्व विरोधकांना दणका; EVMबाबतची पुनर्विचार याचिका SCनं फेटाळली

अनंतनागचं महत्त्व

अनंतनाग लोकसभेची जागा खूप कारणांनी महत्त्वाची आहे. कारण, 2014मध्ये या ठिकाणावरून माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती विजयी झाल्या होत्या. पण, त्यांच्या राजीनाम्यानंतर या ठिकाणी पोटनिवडणुका झालेल्या नाहीत. घाटीमध्ये असलेली अशांतता यासाठी कारणीभूत आहे. निवडणूक आयोगाची आकडेवारी पाहिल्यानंतर 1996नंतर सर्वात जास्त काळ रिक्त राहिलेली अनंतनाग ही जागा आहे.

या जागेवरून पीडीपी अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद सईद, काँग्रेसचे नेते मोहम्मद शफी कुरेशी देखील खासदार म्हणून विजयी झाले आहेत. अनंतनाग पीडीपीचा गड म्हणून देखील ओळखला जातो. 2014मध्ये झालेल्या अनंतनागमधील 16 विधानसभा जागांपैकी 11 जागा पीडीपीनं जिंकल्या होत्या.

VIDEO: FRP थकवणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांकडून चाप

First published: May 7, 2019, 2:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading