पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या सातव्या टप्प्यातही हिंसाचाराचं गोलबोट

परस्परांच्या उमेदवारांवर हल्ले करणं, नेत्यांच्या गाड्या फोडणं, मतदान केंद्रात जाऊन धुडगूस घालणं, कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करणं अशा घटना पश्चिम बंगालमध्ये आज घडल्या

परस्परांच्या उमेदवारांवर हल्ले करणं, नेत्यांच्या गाड्या फोडणं, मतदान केंद्रात जाऊन धुडगूस घालणं, कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करणं अशा घटना पश्चिम बंगालमध्ये आज घडल्या

  • Share this:
    नवी दिल्ली 19 मे :  पश्चिम बंगालमध्ये सातव्या टप्प्यातही हिंसाचाराच्या घटनांनी गालबोट लागलं. या आधीच्या सहा टप्प्यांमध्येही बंगालमधे हिंसाचार घडला होता. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये धुमश्चक्री असल्याने हा हिंसाचार घडला आहे. तृणमूल गुंडांचा वापर करून उमेदवार आणि कार्यकर्त्यांना धमकावत असल्याचा आरोप भाजपने केलाय. निवडणूक आयोगाने त्याची दखल घ्यावी अशी मागणीही भाजपने केली आहे. परस्परांच्या उमेदवारांवर हल्ले करणं, नेत्यांच्या गाड्या फोडणं, मतदान केंद्रात जाऊन धुडगूस घालणं, कार्यकर्त्यांच्या घरांवर हल्ले करणं अशा घटना पश्चिम बंगालमध्ये आज घडल्याने आयोगाकडे तक्रारींचा पाऊस पडला. तृणमूलच्या अनेक उमेदवारांनी मतदान केंद्रात जाऊन सुरक्षा दलांशी वाद घातला. मतदारांवर प्रभाव पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला जातोय. तर केंद्राय सुरक्षा दलांना हाताशी धरून मतदान केंद्रात गैरप्रकार करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचा आरोप तृणमूलने केला आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा हिंसा भडकली. राज्याच्या 24 परगना जिल्ह्याच्या भाटपाड्यात शनिवार रात्री उशीरा जमावाने अनेक गाड्यांची तोडफोड केली. या दरम्यान जमावाने दोन गाड्यांवर बॉम फेकले. नंतर एकच गोंधळ उडाला. दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या आहेत. दंगलखोरांनी अनेक भागात जाळपोळ आणि दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस कूमक तैनात करण्यात आली आहे. पोलिस परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. शेवटच्या टप्प्यात 59 जागांसाठी मतदान झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघातही मतदान होणार आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेश (प्रत्येकी 13), पश्चिम बंगाल (9), बिहार आणि मध्य प्रदेश (प्रत्येकी 8), हिमाचल प्रदेश (4), झारखंड (तीन) आणि चंडीगडमधील एका जागेसाठी रविवारी मतदान झालं तर पणजी (गोवा) येथे एका जागेसाठी पोटनिवडणूक झाली.
    First published: