लोकसभा निवडणूक: 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला!

लोकसभा निवडणूक: 2014 च्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला!

'निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान झालं तर ते प्रस्थापितांच्या विरोधात मतदान आहे असं समजलं जातं. मात्र मतदान फक्त काही टक्के वाढलं असेल तर अंदाज बांधणं अवघड जातं.'

  • Share this:

नवी दिल्ली 29 एप्रिल : लोकसभेच्या 2019 च्या निवडणुकीचा चौथा टप्पा सोमवारी पूर्ण झाला. या टप्प्यात 9 राज्यांमध्ये 72 जागांसाठी मतदान झालं. महाराष्ट्रात सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 51.06 टक्के एवढं मतदान झालं. पूर्ण आकडेवारी आल्यानंतर  हा आकडा 55 टक्क्यांपेक्षाही जास्त जाईल असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. तर देशात पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त 76.47 टक्के मतदान झालं असून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं समजलं जातं. पश्चिम बंगालमध्ये मोठा फायदा होण्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.

निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतदान झालं तर ते प्रस्थापितांच्या विरोधात मतदान आहे असं समजलं जातं. मात्र मतदान फक्त काही टक्के वाढलं असेल तर अंदाज बांधणं अवघड जाते असं मत राजकीय अभ्यासक व्यक्त करत आहेत.

देशात असं झालं मतदान

महाराष्ट्र - 51.06

पश्चिम बंगाल - 76.47

मध्य प्रदेश - 65.86

ओडिशा - 64.05

झारखंड - 63.40

राजस्थान - 62.86

बिहार - 53.67

उत्तर प्रदेश - 53.12

जम्मू आणि काश्मीर - 9.79

चौथ्या टप्प्याच्या मतदानात महाराष्ट्रातल्या 17 जागांचा समावेश आहे. मुंबईत कायम मतदान कमी होतं अशी तक्रार असते मात्र यावेळी मतदारांमध्ये उत्साहाचं वातावरण बघायला मिळालं. मतदानाचं एकूण प्रमाण हे 60 टक्क्यांच्या वर जाईल असाही अंदाज व्यक्त केला जातोय. या मतदानाचा फायदा कुणाला मिळणार याचे अंदाज आता बांधले जात आहेत.

मुंबईत असं झालं मतदान

मुंबई उत्तर-  ५४..७२ टक्के

मुंबई उत्तर-पश्चिम (वायव्य)- ५०.३७ टक्के

मुंबई उत्तर पूर्व (ईशान्य) -   ५२.९४ टक्के

मुंबई उत्तर मध्य - ४९.४२ टक्के

संघटना महत्त्वाची

2014 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली होती. प्रचाराची चर्चाही खूप झाली होती. त्यामुळे मतदारांमध्ये जागृतीही झाली होती. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे ही निवडणूक आहे असं मत शिवसेनेच्या प्रवक्त्या निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केलं. निलमताई म्हणाल्या, नुसतं प्रचार असून चालत नाही. तर मतदारांना बाहेर काढण्यासाठी संघटनात्मक बांधणीही पाहिजे असते. शिवसेनेने गेली अनेक वर्ष ही बांधणी उत्तमपणे केली आहे.

राज ठाकरे फॅक्टर

या निवडणुकीत मनसेने उमेदवार उभे केले नाहीत. मात्र राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात मतदान करा असं आवाहन केलं. त्यासाठी त्यांनी राज्यात 10 सभा घेतल्या. त्यांची चर्चाही प्रचंड झाली. त्यामुळे मनसेचा मतदार कुणाकडे जाईल याचीही चर्चा होत आहे. या आधीच्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसेचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

मतं कुणाकडे जाणार?

त्यामुळे  राज ठाकरे यांच्या आवाहनानंतर मनसेचा मतदार काँग्रेसला मतदान करणार का हा मोठा प्रश्न आहे. किरण तार म्हणाले मनसेचे मतदार हे यावेळी तिसऱ्या आघाडीचा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा विचार करतील असं मत व्यक्त केलं. तर निलम गोऱ्हे म्हणाल्या, मनसेचा मतदार हा 2004 पर्यंत शिवसेनेला मतदान करत होता. नंतर तो मनसेकडे गेला. पण काही वर्षानंतर तो मतदार विरळ होत गेला. त्यामुळे काही मतदार काँग्रेसकडे गेला असला तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

इंजिन कुणाला धडकणार?

मनसेचं  इंजिन रुळावरून घसरेल किंवा सुसाट धावेल हे 23 मेनंतरच ठरणार असलं तरी त्यांच्या शिट्टीने अनेकांवर परिणाम झाला आहे. त्यांनी मोदी आणि शहांना मतदान करू नका असं आवाहन केलं त्याचा आघाडीला फायदा नक्कीच मिळणार आहे असं मत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन यांनी व्यक्त केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 07:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading