रायबरेली, 02 मे : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी – वाड्रा सध्या लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. यावेळी त्या समाजातील प्रत्येक घटकापर्यंत जात त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत. प्रियांका गांधी यांनी अमेठीमध्ये मुलांची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल अपशब्द वापरणाऱ्या मुलांना प्रियांका गांधींनी रोखल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर आता गारूड्यांची भेट घेतल्यानंतर प्रियांका गांधी यांना साप हाती घेण्याचा मोह आवरला नाही. आपल्या भेटीदरम्यान प्रियांका गांधी यांनी लोकांशी संवाद साधला. त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या.
#WATCH Priyanka Gandhi Vadra, Congress General Secretary for Uttar Pradesh (East) meets snake charmers in Raebareli, holds snakes in hands. pic.twitter.com/uTY0R2BtEP
लोकसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधी – वाड्रा सध्या जोरदार प्रचार करत आहेत. सोमवारी अमेठीमध्ये प्रचार करत असताना प्रियांका गांधीसमोर काही मुलांनी नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी मुलांनी चौकीदार चोर है! चौकीदार चोर है! अशा घोषणा दिल्या. पण, अचानकपणे मुलांनी आपल्या घोषणेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात अपशब्द वापरले. त्यावेळी प्रियांका गांधी यांनी मुलांना शांत राहण्यास सांगितले. शिवाय, अशा प्रकारची घोषणाबाजी अयोग्य असल्याचं प्रियांका गांधी यांनी मुलांना सांगितले. चौकीदर चोर है! ही घोषणा ठिक आहे. पण, अपशब्द वापरू नका. चांगली मुलं बना असा मोलाचा सल्ला यावेळी प्रियांका गांधी यांनी मुलांना दिला. सध्या समाजमाध्यमांवर या व्हिडीओची चर्चा जोरात सुरू आहे.
Uncouth to the core. Imagine the filthiest of abuses that a Prime Minister has to endure from people whose only claim to fame is a nose. Lutyens outrage anyone ???? https://t.co/T5sPyKtmbr
— Chowkidar Smriti Z Irani (@smritiirani) April 30, 2019
त्यानंतर आता प्रियांका गांधी यांनी हाती घेतलेल्या सापाच्या व्हिडीओची चर्चा सुरू झाली आहे.
SPECIAL REPORT : मोदींविरोधात लढण्याआधीच माजी सैनिक हरला!