कुठे हिंसाचार तर कुठे EVMमध्ये बिघाड, पहिल्या टप्प्याचं पार पडलं मतदान

कुठे हिंसाचार तर कुठे EVMमध्ये बिघाड, पहिल्या टप्प्याचं पार पडलं मतदान

गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात तीन जवान जखमी झालेत. तर मतदान संपल्यावरही सुरक्षा पथकावर माओवाद्यांनी गोळीबार केला.

  • Share this:

मुंबई 11 एप्रिल : लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान काही घटना वगळता शांततेत पार पडलं. देशातल्या 20 राज्यांमध्ये 91 मतदारसंघांमध्ये हे मतदान झालं. महाराष्ट्रात विदर्भातल्या सात जागांवर आज मतदान झालं. सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 60 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याची माहिती आहे. कडक उन्हामुळे दुपारी मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. सकाळी आणि दुपारनंतर गर्दी झाली. देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती देण्यात आली आहे.

विदर्भातीलल्या 7 मतदारसंघात नागपूर, यवतमाळ, चंद्रपूरसह संवेदनशील गडचिरोलीचाही यामध्ये समावेश आहे. नक्षलग्रस्त गडचिरोलीमध्ये नेहमीप्रमाणे 3 वाजेपर्यंतच मतदान संपवण्यात आलं. तर तिकडे जम्मू आणि काश्मीरमधील 2 जागांसाठीही मतदान पार पडलं. मतदानासाठी खोऱ्यात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली होती. गडचिरोलीमध्ये माओवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात तीन जवान जखमी झालेत. तर मतदान संपल्यावरही सुरक्षा पथकावर माओवाद्यांनी गोळीबार केला.

 विदर्भात संध्याकाळी 5 पर्यंत सरासरी 60 टक्के मतदान

वर्धा - 55.36 टक्के

रामटेक - 51.72

नागपूर - 53.13

भंडारा-गोंदिया - 60.50

गडचिरोली-चिमुर - 61.33

चंद्रपूर - 55.97

यवतमाळ वाशिम -53.97

मुख्यमंत्र्यांचं मतदान

राज्याच्या उपराजधानीत आणि मुख्यमंत्र्यांचं होमग्राऊंड असलेल्या नागपुरात आज देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावला.  केंद्रीय मंत्री आणि नागपुरातले युतीचे उमेदवार नितीन गडकरींनीही मतदान केलं. सोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सकाळीच नागपुरातल्या धरमपेठ मतदान केंद्रावर पोहोचून मतदान केलं. यावेळी त्यांच्या पत्नी अमृता आणि आईही सोबत होत्या.

फेरमतदानाची मागणी

काही राज्यांमध्ये मतदान केंद्रावर EVMमध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या होत्या. आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी फेरमतदानाची मागणीही केली होती.

राज्यांमध्ये असं झालं मतदान

बिहार : 50.26%

तेलंगणा : 60.57%

मेघालय : 62%

उत्तर प्रदेश : 59.77%

मणिपूर : 78.20%

लक्षव्दिप : 65.9%

आसाम : 68%

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 06:49 PM IST

ताज्या बातम्या