मुरादाबाद, 8 एप्रिल : जगात ज्या शहराची ओळख पितळेच्या भांड्याची नगरी म्हणून केली जाते त्या मुरादाबाद शहरांमध्ये पुन्हा एकदा एक शायर निवडणूक लढवत आहे जिगर मुरादाबादी यांच्या या नावाने ओळखल्या जाणाऱ्या मुरादाबाद शहरामध्ये इम्रान प्रतापगडी हा शायर काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहे फक्त तीस वर्षाचा हा शायर मुरादाबाद मध्ये आणि खासकरून पश्चिमी उत्तर प्रदेश मध्ये अनेक युवक-युवतींच्या मनावर राज्य करतो त्याचमुळे मुरादाबाद मधील निवडणूक ही ही अतिशय रंगत दार होणार आहे.
समाजवादी पक्षाच्या वतीने डॉक्टर एसटी हसन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. हे डॉक्टर हसन हे हे समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल या या महाआघाडीचे उमेदवार आहे तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सध्याचे खासदार सर्वेश सिंग यांना पुन्हा एकदा निवडणुकीत उतरविण्यात आले आहे. मुरादाबाद शहरातील पितळी च्या वस्तू या जागतिक स्तरावर निर्यात केल्या जातात त्याचमुळे भारतात या शहराला पितळेची नगरी म्हणून संबोधल्या जाते.
नरेंद्र मोदीच टार्गेट
इम्रान प्रतापगडी यांची प्रत्येक सभा ही एक प्रकारचा मुशायरा असतो आपल्या शायरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करतात त्यामुळे यांच्या जाहीर सभांना मोठी गर्दी असते. उद्योग व्यवसायांसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात नोटबंदीमुळे व्यापाऱ्यांना फटका बसला होता. पण आता परिस्थिती पूर्वपदावर आलीय.
या मतदारसंघातली शहरी भागात मोदींचं आकर्षण दिसंत तर ग्रामीण भागात सरकारवर नाराजी. सपा आणि बसपाच्या आघाडीमुळे. त्यांच्या उमदेवाराचा जोर दिसतोय. पण गावपातळीवर कार्यकर्त्यांना एकत्र येवून एकदिलाने प्रचार करताना अडचणींचा सामना करावा लागतोय. गेल्या 25 वर्षांमध्ये एकमेकांशी वैर घेतल्याने आता पुन्हा मनोमिलन कसं करायचं असा प्रश्न त्यांना पडलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Politics, Uttar pradesh lok sabha election 2019