नवी दिल्ली 15 मे : लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा शेवटचा टप्पा राहिला असताना पश्चिम बंगालमध्ये रणकंदन माजलंय. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये महाभारत सुरू आहे. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालचं 'बगदीदी' बनायचं आहे असा गंभीर आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलाय.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोडशोवरून मंगळवारी कोलकात्यात राडा झाला होता. त्यावरून योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर शब्दात टीका केलीय.
इस्लामीक स्टेटचा प्रमुख बगदादी यांच्या प्रभावाने तुम्हाला बंगालचा बगदीदी व्हायचं आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बंगाल हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याला आम्ही मुख्य प्रवाहापासून तोडू देणार नाही असंही योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपा से भयभीत ममता बंगाल में सभाओं के मंच तोड़कर, मजदूरों को पीटकर,रैलियां रद्द करवाकर बंगाल को क्या बनाना चाहती हैं?
— Chowkidar Yogi Adityanath (@myogiadityanath) May 15, 2019
याद रखिये,बंगाल भारत का अभिन्न अंग है,
बगदादी से प्रभावित होकर "बगदीदी" बनने का आपका सपना भारत माँ के सच्चे सपूत वोट की चोट से तोड़कर रहेंगे।
जय हिंद।
जय भारत।
अंमित शहांचा आरोप
पश्चिम बंगालमधील रॅलीदरम्यान मला सीआरपीएफची सुरक्षा नसती तर मी सुखरूप बचावलो नसतो, असा दावा भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे. बंगालमध्ये रॅलीदरम्यान हिंसाचार झाल्यानंतर अमित शहा यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मतांच्या राजकारणासाठी तृणमूल काँग्रेस हिंसा घडवून आणत आहे, असा गंभीर आरोपही अमित शहा यांनी यावेळी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल
ममता बॅनर्जींवर घणाघाती टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरची निवडणूकही बंगालच्या तुलनेत शांतते पार पडली, असं विधान केलं आहे. मोदी यांनी News18 ला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पश्चिम बंगालमधल्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली. "लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आणि स्वतःला पक्षीय राजकारणापासून अलिप्त समजणारेही बंगालच्या हिंसाचाराबद्दल काही बोलत नाहीत, हे जास्त चिंताजनक आहे. माझा तिरस्कार करण्याच्या आणि भाजपला विरोध करण्याच्या नादात ते बाकी सगळं माफ करताहेत. यामुळे देशापुढच्या समस्या वाढणार आहेत," असं नरेंद्र मोदी म्हणाले.