गौतम गंभीरचा खुलासा; या दोन व्यक्तिंमुळं आला राजकारणात

गौतम गंभीरचा खुलासा; या दोन व्यक्तिंमुळं आला राजकारणात

राजकारणात येण्याबाबत गौतम गंभीरनं खुलासा केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 मे : भारताचा माजी क्रिकेटर गौतम गंभीर आता राजकारणाचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. गौतम गंभीरला भाजपनं पूर्व दिल्लीतून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. यावेळी गौतम गंभीर जोरदार प्रचार करत असून त्यानं आम आदमी पक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. शिवाय, राजकारणात येण्याबाबत देखील त्यानं मोठा खुलासा केला आहे. 'न्यूज18'शी बोलताना गौतम गंभीरनं राजकारण हे आव्हानांनी भरलेलं आहे. पण, लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात आल्याचं म्हटलं आहे.

शिवाय, राजकारणात येऊन मला लोकांची सेवा करायची आहे असं गौतम गंभीरनं म्हटलं आहे. क्रिकेट हे माझं पहिलं प्रेम असलं तरी लोकांची सेवा करण्याची माझी इच्छा असल्याचं गौतम गंभीरनं 'न्यूज18'शी बोलताना स्पष्ट केलं.

आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अजहरला आता पाकिस्तानचा दणका

कुणामुळे आला गौतम गंभीर राजकारणात?

'न्यूज18'शी बोलताना गौतम गंभीरनं राजकारणात येण्याबद्दल खुलासे केले. राजकारणात उतरण्य़ामध्ये दोन व्यक्तिंची मुख्य भूमिका असल्याचं गौतम गंभीरचं म्हणणं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सकारात्मक विचार करतात. नरेंद्र मोदी करत असलेलं काम पहून आजची पिढी राजकारणात येण्यासाठी प्रेरित होत असल्याचं गंभीरनं म्हटलं आहे. त्यामुळे मी राजकारणात आल्याचं गंभीरनं म्हटलं आहे.

Fani Cyclone : वादळी पाऊसवाऱ्यातच 'त्या' 3 महिलांना प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि...

अरविंद केजरीवलांवर हल्लाबोल

यावेळी गौतम गंभीरनं अरविंद केजरीवालांवर हल्लाबोल केला. 4 वर्षात अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेला मुर्ख बनवल्याची टीका गौतम गंभीरनं केली. लोकांना भावनिक मुद्यांमध्ये अडकवून केजरीवाल राजकारण करत असल्याचा आरोप गौतम गंभीरनं केला आहे.

दिल्लीचा विकास हाच ध्यास

दरम्यान, दिल्लीचा विकास हाच ध्यास असल्याचं गौतम गंभीरनं स्पष्ट केलं. तर, दोन मतदान ओळखपत्र असल्याचे आपचे आरोप यावेळी गौतम गंभीरनं फेटाळून लावले आहेत.

VIDEO: मुंबईच्या रस्त्यावर धावली 'द बर्निंग बस'

First published: May 3, 2019, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading