पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल' आणि 'भाजप'चं धुमशान, दीदींना बसणार धक्का?

पश्चिम बंगालमध्ये 'तृणमूल' आणि 'भाजप'चं धुमशान, दीदींना बसणार धक्का?

उत्तर प्रदेशात ज्या जागा कमी होतील त्याची भरपाई पश्चिम बंगालमधून होऊ शकते असं भाजपला वाटतं आहे.

  • Share this:

कोलकता 23 एप्रिल : पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या गडाला खिंडार पाडण्यासाठी भाजपने जोरदार कंबर कसलीय. त्यामुळे यावेळी सर्व देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलं आहे. आत्तापर्यंत स्पर्धेत नसलेल्या भाजपने गेल्या काही वर्षात पश्चिम बंगालमध्ये चांगलेच हात पाय पसरले आहेत. लोकांनी आम्हाला परिवर्तन पाहिजे असं म्हटलंय तर तृणमूलची पाळमुळं उखडून टाकलं हे भाजपला पाहिजे तेवढं सोपं नाही हे दिसून आलं 'न्यूज18 इंडिया'च्या 'भैयाजी कहिन' या निवडणूक यात्रेमधून.

कम्युनिष्टांचा 35 वर्षांचा गड उध्वस्त करत ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवली. गेल्या 10 वर्षांपासून त्यांची राज्यात सत्ता आहे. लोकसभेतही तृणूलचे सर्वाधिक खासदार आहेत. मात्र गेल्या काही वर्षात भाजपने तिथे हातपाय पसरायला सुरूवात केलीय. तृणमूलचे अनेक दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्याने पक्षाला धक्का बसलाय. भाजपकडे उमेदवारी द्यायलाही माणसं नाहीत अशी टीका तृणमूलचे ज्येष्ठ नेते दिनेश त्रिवेदी यांनी केलीय.

उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रानंतर पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या सर्वात जास्त म्हणजे 42 जागा आहेत. तृणमूल अल्पसंख्याकांचा तुष्टीकरण करतं हा मुद्दा घेऊन भाजपने जोरदार प्रचार केलाय. त्याचा फायदा होईल असं भाजपला वाटतं.  तरुण आणि जे नवीन मतदार आहेत ते आपल्या बाजूने वळतील असं भाजपला वाटतं. तर यावेळी तरुणांनाही भाजपचं आकर्षण वाटतं आहे.

2014 च्या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 73 जागा उत्तर प्रदेशात मिळाल्या होत्या. यावेळी एवढ्या जागा मिळणं त्यांना शक्य नाही त्यामुळे पश्चिम बंगालमधून त्या जागांची काही भरपाई होऊ शकते असं भाजपला वाटतं आहे.

लोकसभा निवडणुकीत ज्या राज्यात सर्वात जास्त राजकीय युद्ध बघायला मिळत आहे ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या विरुद्ध वातावरण असल्यानेच त्यांनी बांग्लदेशच्या कलाकारांना प्रचारासाठी बोलावलं असा आरोप भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियो यांनी केलाय. CNNnews18च्या TheRightStand या कार्यक्रमात ते बोलत होते. केवळ व्होट बँकेचं राजकारण करण्यासाठी या कलाकारांना बोलावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. तर तृणमूलने हे आरोप फेटाळून लावले.

बांग्लादेश आणि पश्चिम बंगालची संस्कृती, भाषा, आणि सामाजिक परिस्थिती सारखीच असल्यानेच या कलाकारांना बोलावलं असावं असं मत राजकीय विश्लेषक तौसिफ खान यांनी व्यक्त केलं. असे कलाकार बोलावण्यात या वावगं आहे असंही ते म्हणाले.

तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या विरुद्ध वातावरण असल्यानेच त्यांनी बांग्लादेशी कलाकारांना बोलावण्याचा निर्णय घेतला असावा असं मत अभ्यासक गीता भट यांनी व्यक्त केलं. लोकसभेच्या निवडणुकीत यावर्षी काही कलाकार उमेदवार आहेत तर काही कलाकारांना प्रचारासाठी बोलवलं जात आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी बंगाली चित्रपटसृष्टीतल्या अभिनेत्यांना उमेदवारी दिली आहे. पण त्यांच्या प्रचारसभांमध्ये बांग्लादेशी कलाकार आल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बांग्लादेशमधले लोकप्रिय कलाकार फिरदोस यांनी रविवारी ममतांच्या तृणमूल काँग्रेसचा प्रचार केला होता. त्यातच आता गाझी अबदून नूर हे अभिनेतेही ममतांच्या प्रचारात दिसले.

तृणमूल काँग्रेसचे दमदमचे उमेदवार सौगात रॉय यांच्यासाठी बांग्लादेशी अभिनेते अबदून नूर यांनी प्रचार केला. 71 वर्षांचे सौगात रॉय हे 2009 पासून पक्षाचे खासदार आहेत. त्यांच्या प्रचारात बांग्लादेशी कलाकारांची गरज काय, असा प्रश्न विरोधकांनी विचारला आहे.

First published: April 23, 2019, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading