LIVE NOW

Lok Sabha Elections 2019 : देशभरात पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं

लोकसभा निवडणूक 2019साठी आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहेत.

Lokmat.news18.com | April 11, 2019, 9:05 PM IST
facebook Twitter Linkedin
Last Updated April 11, 2019
auto-refresh

Highlights

Load More
नवी दिल्ली, 11 एप्रिल : लोकसभा निवडणूक 2019साठी देशात आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहेत. 20 राज्यांतील 91 जागांवर आणि चार राज्यांमध्ये विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. आज अनेक दिग्गजांचं भवितव्य यंत्रबंद होणार आहे.
विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. येथे नितीन गडकरी, हंसराज अहीर या केंद्रीय मंत्र्यांसह काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, नाना पटोले, किशोर गजभिये यांसारख्या अनेक बड्या नेत्यांचं भवितव्य पणाला लागलं आहे.
पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, मेघालय, उत्तराखंड, मिझोरम, नागालँड, सिक्किम आणि तेलंगणातील सर्व लोकसभा मतदारसंघातील जागांवर मतदान होत आहे. याव्यतिरिक्त उत्तर प्रदेशच्या आठ जागा, बिहारच्या चार जागा तर आसाम आणि महाराष्ट्रातील सात जागा, ओडिशातील चार जागा आणि पश्चिम बंगालच्या दोन जागांवर मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
उत्तर प्रदेश
1.सहारनपूर 2. कैराना 3. मुझफ्फरनगर 4. बिजनौर 5. मेरठ 6.बागपत 7.गाझियाबाद 8.नोएडा.
बिहार
1.औरंगाबाद 2.गया 3. नवादा 4.जमुई