सालोन (हिमाचल प्रदेश) 13 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय. जे लोक जामीनावर आहेत ते चौकीदाराला शिव्यांची लाखोळी वाहत आहेत अशी टीका त्यांनी हिमाचल प्रदेशातल्या सालोन इथं बोलताना केली. काँग्रेसचे नेते एवढ्या शिव्या देत आहेत की त्यांना नवे शब्द शोधण्यासाठी डिक्शनरीचा आधार घ्यावा लागतोय अशी टीकाही त्यांनी केली.
लोकसभा निवडणुकीचा आता शेवटचा टप्पा राहिलाय. 19 मे रोजी शेवटच्या टप्प्यातलं मतदान आहे त्यामुळे प्रचारही शिगेला पोहोचलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचा प्रचारात उल्लेख केल्याने वातावरण आणखीच तापलं होतं. त्यामुळे काँग्रेसने मोदींवर जोरदार टीका केली होती. त्याला मोदींनी उत्तर दिलंय.
PM Modi in Solan, Himachal Pradesh: Those who are themselves on bail search new words from their dictionary daily to abuse your 'chowkidaar'. But your 'chowkidaar' is not going to budge because of their abuses, "aakhirkar humne bhi to Solan ka mushroom khaya hai" pic.twitter.com/byvqi6Sfvb
— ANI (@ANI) May 13, 2019
मोदी म्हणाले, काँग्रेस आपल्या पुर्वजांच्या पुण्याईवर मतं मागतं. मात्र मी जेव्हा त्यांचा उल्लेख करतो तेव्हा त्यांना राग येतो. त्यांनी जी कामं केली आहेत त्याबद्दल विचारायला पाहिजे की नाही?1984 मध्ये घडलेल्या शिख हत्याकांडाबद्दल त्यांचे नेते म्हणतात जो हुआ सो हुआ. काँग्रेसची हीच मानसिकता असल्याची टीकाही त्यांनी केली.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात कोर्टाने सोनिया आणि राहुल गांधी यांना जामीन मंजूर केला आहे. पंतप्रधान वारंवार त्याचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका करतात. युपीएच्या काळात काँग्रेसने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले नाहीत. देशाला त्याची किंमत मोजावी लागली असंही ते म्हणाले.