'...तर या कारणास्तव फक्त VVPATची मतं धरली जातील ग्राह्य'

'...तर या कारणास्तव फक्त VVPATची मतं धरली जातील ग्राह्य'

EVM आणि VVPATमधील मतांमध्ये तफावत आढळल्यास VVPATची मतं ग्राह्य धरली जाणार आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 16 मे : देशात सात टप्प्यांमध्ये पार पडणाऱ्या लोकसभा निवडणुकीचे निकाल हे 23 मे रोजी लागणार आहेत. यावेळी EVM सोबत VVPATची मतमोजणी देखील केली जाणार आहे. परिणामी निकाल उशिरा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मतमोजणी दरम्यान EVM आणि VVPATमधील मतांमध्ये तफावत आढळल्यास VVPATची मतं ही अंतिम मानली जातील असं यावेळी निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे.

मतमोजणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदार केंद्रातील 5 EVM आणि VVPATची मतमोजणी केली जाणार आहे. शिवाय, उमेदवाराच्या मागणीनुसार काही विशिष्ट EVM आणि VVPATची मतमोजणी केली जाऊ शकते. याबाबत निवडणूक आयोगानं राज्यातील निवडणूक अधिकाऱ्यांना मतमोजणी दरम्यान काही निर्देश जारी केले आहेत.


ट्विटरवरील EXIT POLL बाबतचे ट्वीट हटवा; निवडणूक आयोगाचे आदेश

विरोधकांची मागणी SCनं फेटाळली

EVM संदर्भात विरोधीपक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या याचिकेमध्ये 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी 21 विरोधीपक्षांनी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांची पुनर्विचार याचिका 7 मे रोजी फेटाळून लावली आहे. EVMमध्ये घोळ असल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला होता. त्याचा फायदा हा भाजपला होत असून 50 टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली. सुनावणी दरम्याम यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला होता.

EVMबाबत शंका

विरोधकांकडून यापूर्वी देखील ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ईव्हीएमचा फायदा हा भाजपला होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून याविरोधात सातत्यानं आरोप होत आहेत. ईव्हीएम हॅक करून भाजप निवडणुका जिंकत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.


SPECIAL REPORT: पायघड्या, बँडबाजा, फुलांचा वर्षाव...चिमुकल्या नातीचं जंगी स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 09:45 AM IST

ताज्या बातम्या