पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रॅलीवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बिहारमधील प्रचारसभेदरम्यान दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

  • Share this:

पाटणा, 04 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा प्रचाराकरता देशभर फिरत आहेत. आपल्या प्रचार दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी ( 5 मे ) बिहारमधील चंपारणमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. नरेंद्र मोदींची ही प्रचारसभा दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असून त्यावेळी हल्ला होऊ शकतो अशी माहिती गुप्तचर विभागानं जिल्हा प्रशासनाला दिली आहे. लष्कर-ए-तोयब आणि जमात-उल-दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेदरम्यान हल्ला करू शकतात अशी माहिती गुप्तचर विभागानं दिली आहे. त्य़ामुळे आता सुरक्षेची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे. सुत्रांनी याबाबतची माहिती दिली आहे.

चंपारणमधील वाल्मीकीनगर, पश्चिम चंपारण आणि पूर्व चंपारणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी एनडीएच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहेत. त्यापार्श्वभूमिवर आता सुरक्षा व्यवस्था देखील कडक करण्यात आली आहे. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, केंद्रीय मंत्री रामविलास पासवान, राधामोहन सिंह देखील हजर राहणार आहेत. सभेदरम्यान सुरक्षेची जबाबदारी ही SPG सोबत NSGला देखील सांभाळावी लागणार आहे.

प्रियांका गांधींवर टीका करायला मोदींनी वापरला नेहरूंचा 'तो' फोटो

पंतप्रधानांचा सहावा बिहार दौरा

17व्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदी सहाव्यांदा बिहार दौऱ्यावर येणार आहे. यापूर्वी त्यांनी 2 एप्रिल, 11 एप्रिल, 20 एप्रिल, 25 आणि 30 एप्रिल रोजी देखील बिहारचा दौरा केला आहे. बिहारमध्ये चार टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका संपन्न होणार आहेत.

यापूर्वी आपल्या जाहीर सभेदरम्यान पंतप्रदान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रहित आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यांवर भर दिला आहे. शिवाय, प्रचारादरम्यान दहशतवादाचा मुद्दा देखील भाषणाच्या केंद्रस्थानी राहिला आहे.

दहशतवादी हल्ल्याची शक्यता व्यक्त केल्यानं सुरक्षा यंत्रणा देखील आता सुरक्षा आणखी मजबूत करण्यावर भर देताना दिसत आहेत.

VIDEO: स्मृती इराणींचा अमेठीत राहुल गांधींवर हल्लाबोल, मराठीतून साधला संवाद

First published: May 4, 2019, 2:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading