नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या जवानानं नोकरीच नाही मुलगा देखील गमावलाय

नरेंद्र मोदींना आव्हान देणाऱ्या जवानानं नोकरीच नाही मुलगा देखील गमावलाय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देणाऱ्या जवानानं आपला 22 वर्षाचा मुलगा देखील गमावला आहे.

  • Share this:

वाराणसी, 29 एप्रिल : वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात सपानं तेज बहादूर यादव यांना उमेदवारी दिली आहे. यापूर्वी तेज बहादूर यादव हे अपक्ष म्हणून उभे होते. पण, उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना सपानं उमेदवारी दिली आहे. त्यानंतर काँग्रेसनं देखील आपला उमेदवार मागे घेत सपाला पाठिंबा द्यावा अशी मागणी आपचे नेते आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विटरवरून केली आहे.

वडिलांच्या चितेची आग विझण्यापूर्वी त्यानं केलं मतदान

कोण आहे तेज बहादुर यादव

बीएसएफमधील जवान तेज बहादुर यादव गेल्या एक वर्षात चर्चेत आले होते. जवानांना दिले जाणाऱ्या जेवणाचा दर्जा खराब असल्यावरून यादव यांनी एक व्हिडिओ शेअर केला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. अर्थात चौकशीनंतर त्यांनी केलेले आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध झाले आणि त्यांना नोकरीवरुन काढून टाकण्यात आले. या निवडणुकीत भलेही माझा पराभव होईल. पण हायप्रोफाईल मतदारसंघातून निवडणू्क लढवल्यामुळे जवानांच्या समस्येवर प्रकाश पडेल असे त्यांचे म्हणणे आहे.

वाराणसीत मोदींच्या विरुद्ध काँग्रेसने अजय राय यांना उमेदवारी दिली आहे. याशिवाय मोदींच्या विरुद्ध अनेक जण लढत आहेत. वारणसीमधून मोदींच्या विरोधात 111 जवान आणि एक निवृत्त न्यायाधिश निवडणूक लढवत आहेत. 2014मध्ये मोदींनी येथून विजय मिळवला होता. तेव्हा अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली होती. त्यामुळे केजरीवाल यांची उमेदवारीने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते. पण यंदा मात्र ही निवडणूक आणखी रंजक होणार आहे.

नवऱ्याचा खून करून व्हॉट्सअ‍ॅपवर चॅट करत होती माजी मुख्यमंत्र्याची सून

मुलाचं देखील निधन

तेज बहादूर यादव यांच्या 22 वर्षाच्या मुलाचा जानेवारी 2018मध्ये मृत्यू झाला होता. रोहित असं त्यांच्या मुलाचं नाव होतं. संशयित अवस्थेमध्ये रोहितचा मृतदेह घरातील खोलीत आढळून आला होता. रोहितच्या शरीरावर गोळीचं निशाण होतं. घरच्यांनी यामध्ये घातपाताची शक्यता व्यक्त केली होती.

VIDEO : राज ठाकरेंनी पावणे दोन तास रांगेत उभं राहून बजावला मतदानाचा हक्क

First published: April 29, 2019, 6:19 PM IST

ताज्या बातम्या