मोदी आणि शहांविरुद्धच्या तक्रारी या तारखेपूर्वी निकाली काढा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

मोदी आणि शहांविरुद्धच्या तक्रारी या तारखेपूर्वी निकाली काढा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांविरुद्ध विविध 9 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 02 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरूद्धच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी 6 मे पूर्वी निकाली काढा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने आज निवडणूक आयोगाला दिले. मोदी आणि शहांविरुद्ध विविध 9 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र अनेक दिवसांनंतरही आयोग निकाल देत नसल्याने काँग्रेसने अखेर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. मतदानाचे आता फक्त तीन टप्पे शिल्लक आहेत. 19 मे रोजी चवथ्या टप्प्याचं मतदान होत आहे. तर चार टप्प्यांचं मतदान पूर्ण झालंय. त्यामुळे लवकरात लवकर निकाल लागला पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली होती.

सर्जिकल स्ट्राईक, भारताचे हवाई हल्ले, शहीद जवान, पंतप्रधानांचं तृणमूलचे 40 आमदार संपर्कात असल्याचं वक्तव्य अशा अनेक वक्तव्यांवरून या तक्रारी आल्या आहेत. तर दोन तक्रारींमध्ये आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लिन चीट दिली आहे. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या एका वक्तव्याबद्दल आयोगाने नोटीस दिलीय.

या आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सपाचे नेते आझम खान, साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्ध आयोगाने आचारसंहिता भंगाची कारवाई केली होती. आयोग भेदभाव करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

स्मृती इराणींची प्रियंका गांधींवर टीका

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासमोर लहान मुलं 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देणारा व्हीडीओ व्हायरल झाला आणि नव्या वादाला तोंड फुटलं. त्यावरूनच अमेठीच्या भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केलीय. सुसंस्कृत कुटुंबांनी आणि पालकांनी आपल्या मुलांना प्रियंका गांधी यांच्यापासून दूर ठेवावं असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. ANIला दिलेल्या मुलखतीत त्यांनी ही टीका केली.

अमेठीच्या दौऱ्यावर असताना प्रियंका गांधी यांच्या भोवती लहान मुलांनी गराडा घातला होता आणि ते चौकीदार चोर है अशा घोषणा देतात. ही घोषणाबाजी सुरू असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीही घातली. शिवी घातल्याबरोबर प्रियंकांनी तोंडावर हात ठेवल्याचं व्हीडीओत दिसतं आहे. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली.

First published: May 2, 2019, 5:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading