'स्विगी'चा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आता लोकसभेच्या रिंगणात

'स्विगी'चा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आता लोकसभेच्या रिंगणात

'स्विगी'चा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह आता बंगळूरू मध्य मध्य या मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरला आहे.

  • Share this:

बंगळूरू, 16 मार्च : गल्लेगठ्ठ पगार सोडून राजकारणात उतरण्याचा विचार आता तरूणाई करताना दिसत नाही. शिवाय, अशी उदाहरणं अपवादात्मक दिसून येतात. पण, आता 'स्विगी'चा डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. विश्वास नाही ना बसत? हो, हे खरं आहे.  38 वर्षाच्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हनं चक्क गल्लेगठ्ठ पगाराची नोकरी सोडून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. यावर तो थांबला नाही तर त्यानं बंगळूरू मध्य मतदारसंघातून उमेदवारी देखील दाखल केली. जेनिफर रसेल असं या कलंदर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचं नाव आहे. त्यामुळे टेलिकॉम इंजिनिअर असलेला  रसेल आता निवडणुकीच्या रिंगणात तुम्हाला अपक्ष निवडणूक लढवताना दिसणार आहे.

'एक हसतमुख आणि दुसरे देशमुख, या दोघांनी महाराष्ट्राची लावली वाट'

का घेतला रसेनं निवडणूक लढवण्याचा निर्णय

टेलिकॉम इंजिनिअर असलेला रसेल हा यापूर्वी उबेर कंपनीमध्ये कामाला होता. त्यानंतर तो 'स्विगी'मध्ये रूजू झाला. यावेळी त्याला नागरिकांना असलेल्या समस्यांची जाण निर्माण झाली. नागरिकांना रस्ते, पाणी, शिवाय आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं रसेलला जाणवलं. त्यामुळे काहीतरी आव्हानात्मक करण्याच्या निर्णयानं रसेलनं लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.

सुरूवातीला रसेल एसी कारनं  प्रवास करत असे. पण, दुचाकीवरून प्रवास करताना त्याला नेमक्या काय समस्या आहेत याची जाणीव झाली. त्यानंतर तो आता निवडणूक लढवत आहे. दरम्यान, बंगळूरू मध्य मतदारसंघातून 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. डिश अ‍ॅटीना हे रसेलचं निवडणूक चिन्ह आहे. यावेळी रसेलनं लोकांनी योग्य त्या उमेदवाराला मतदान करावं असं आवाहन केलं आहे. त्यामुळे निवडणुकीच्या मैदानात रसेल बाजी मारणार का हे आता पाहावं लागणार आहे.

VIDEO: रितेश देशमुखही प्रचाराच्या मैदानात; पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

First published: April 16, 2019, 3:04 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading