• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • VIDEO स्वरा भास्करचं 'जय भीम' सोशल मीडियावर हिट; 'या' उमेदवारासाठी करतेय प्रचार

VIDEO स्वरा भास्करचं 'जय भीम' सोशल मीडियावर हिट; 'या' उमेदवारासाठी करतेय प्रचार

वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि बोल्ड व्यक्तिरेखांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्करने केलेलं पहिलं राजकीय भाषण सोशल मीडियावर हिट होतंय. जिया हो बिहार के लाला... असं म्हणत तिने कुणासाठी सभा घेतली पाहा...

 • Share this:
  पाटणा, 11 एप्रिल : वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि बोल्ड व्यक्तिरेखांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री स्वरा भास्करने केलेलं पहिलं राजकीय भाषण सोशल मीडियावर हिट होतंय. स्वराने स्वतःच या भाषणाची क्लिप 'भाषणबाजी' सोशल मीडियावर शेअर केली आहे. जिया हो बिहार के लाला... असं म्हणत तिने कन्हैय्या कुमारसाठी प्रचारसभा घेतली. कन्हैय्या कुमार बिहारमधल्या बेगुसराई इथून निवडणूक लढवत आहे. भाकपाचा अधिकृत उमेदवार म्हणून ते रिंगणात आहेत. त्यांच्या प्रचारसभेत स्वराने पहिल्यांदाच राजकीय भाषण केलं. जिया हो बिहार के लाला... असं कन्हैय्याला म्हणत तिने या उमेदवारालाच मतं देण्याचं आवाहन केलं. स्वराने बिहारमध्ये कन्हैय्या कुमारसाठी प्रचारसभा घेतली. यामध्ये आपण बिहारी असल्याचा अभिमान असल्याचं तिने सांगताच उपस्थितांनी जल्लोष केला. या सभेला जिग्नेश मेवाणीसुद्धा उपस्थित होते. प्रचारसभेनंतर स्वराने जिग्नेश मेवाणी आणि कन्हैय्या कुमार यांच्याबरोबर सेल्फी घेतला आणि आपल्या पहिल्या भाषणबाजीचा व्हिडिओसुद्धा स्वतःच सोशल मीडियावर शेअर केला. आपल्या वादग्रस्त विधानांसाठी नेहमीच चर्चेत असलेली बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर भीमा कोरेगाव दंगल प्रकरणानंतरही तिच्या भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे चर्चेत आली होती. भाजप सरकारविरोधात तिने वादग्रस्त वक्तव्य केलं. महात्मा गांधींच्या हत्येनंतर आनंद साजरा करणारे सत्तेत बसल्याचं वादग्रस्त विधान अभिनेत्री स्वरा भास्करनं त्या वेळी केलं होतं.  
  First published: