News18 Lokmat

VIDEO : UPA आणि NDAच्या काळात झालेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये हा आहे फरक

'लष्कराविषयी किंवा त्यांच्या पराक्रमाविषयी बोलताना सर्वच राजकीय पक्षांनी मर्यादा पाळावी. राजकारणात अशा मर्यादांचं पालन केलं नाही तर कुठल्याच गोष्टींना अर्थ राहणार नाही.'

News18 Lokmat | Updated On: May 6, 2019 10:53 PM IST

VIDEO : UPA आणि NDAच्या काळात झालेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये हा आहे फरक

नवी दिल्ली 06 मे : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातलं मतदान संपलं तरी सर्जिकल स्ट्राईकचा मुद्दा अजुनही प्रचारात कायम आहे. UPAच्या कळातही सर्जिकल स्ट्राईक झालेत असं सांगत काँग्रेसने नुकतीच सहा घटनांची एक यादी जाहीर केली होती. मात्र आता त्यावरूनही मतभेद समोर आले आहेत. लष्कर हे दरवेळी काही ऑपरेशन्स करत असतं मात्र त्यात मोठा फरक असतो असं मत लष्करातल्या माजी अधिकाऱ्यांनी व्यक्त केलंय.निवडणुकीत लष्करी कारवायांचा मुद्दा तापू लागल्याने पाचव्या टप्प्याच्या मतदानाच्या काही दिवस आधी काँग्रेसने UPAच्या काळातल्या सहा घटनांची एक यादी जाहीर केली. लष्कराने या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक केले होते असं काँग्रेसने स्पष्ट केलं. सर्जिकल स्ट्राईक हे फक्त पहिल्यांदाच झालेले नाहीत असंही काँग्रेसने म्हटलं आहे.


Loading...


लष्कर वारंवार काही मोहिमा राबवत असलं तरी शत्रूच्या प्रदेशात घुसून कारवाई करणं याला वेगळं महत्त्व आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाला बरोबर घ्यावं लागतं. राजकीय इच्छाशक्ती हवी असते. लष्कर पराक्रमी असलं तरी त्याला तो पराक्रम दाखविण्याची संधी दिली पाहिजे. नरेंद्र मोदी यांनी ती शक्ती दाखवली  असं मत ज्येष्ठ पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी यांनी व्यक्त केलं.तर UPAच्या काळात अशाच प्रकारची ऑपरेशन्स झाली होती मात्र त्यावेळी त्या ऑपरेशन्सला सर्जिकल स्ट्राईक असं नाव देण्यात आलं नव्हतं. आता त्याचं  मार्केटिंग केलं जात असल्याचा आरोप निवृत्त मेजर जनरल एजे.बी जैनी यांनी व्यक्त केलं.

लष्कराविषयी बोलताना किंवा त्यांच्या पराक्रमाविषयी बोलताना सर्वच राजकीय पक्षांनी मर्यादा पाळावी असं मत ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई यांनी व्यक्त केलं. राजकारणात अशा मर्यादांचं पालन केलं नाही तर कुठल्याच गोष्टींना अर्थ राहणार नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.लष्कराने मॅनमारमध्ये बंडखोरांविरुद्ध जी कारवाई केली होती तेव्हा पहिल्यांदा त्याला सर्जिकल स्ट्राईक असं म्हटलं गेलं. त्यानंतर उरी आणि नंतर बालाकोट इथं लष्कराने धाडसी कारवाई केली. सगळ्याच राजकीय पक्षांनी अशा गोष्टींचं मार्केटींग करू नये आणि त्याचा राजकीय फायदा घेऊ नये असं मत निवृत्त मेजर जनरल केके सिन्हा यांनी व्यक्त केलं.कुठला राजकीय पक्ष कसा प्रचार करतो हे लोकांना कळतं. लोक शहाणे आहेत. राजकीय पक्ष कितीही भांडवल करत असले तरी ते त्याला बळी पडणार नाहीत असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 6, 2019 10:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...