'राजकीय फायद्यासाठी निकालाचा वापर करू नका,कोर्टाची राहुल गांधींना तंबी'

'राजकीय फायद्यासाठी निकालाचा वापर करू नका,कोर्टाची राहुल गांधींना तंबी'

'कोर्टाच्या आदेशाचा वापर राजकीय कारणांसाठी करता कामा नये.'

  • Share this:

नवी दिल्ली 22 एप्रिल : राफेल विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रचारात रान उठवलं होतं. त्यावरून त्यांनी दिलेली चौकिदार चोर है ही घोषणाही चांगलीच गाजली मात्र सुप्रीम कोर्टाचं नाव घेत त्यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यावरून त्यांना माफी मागावी लागली. कोर्टाने आज जो निकाल दिलाय त्यात राजकीय फायद्यासाठी कोर्टाचा वापर करू नका अशी राहुल गांधी यांना तंबी दिली असा दावा भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांनी केलाय. 'न्यूज18 इंडिया'च्या 'आर पार' या कार्यक्रमात ते बोलत होते.गौरव भाटीया म्हणाले, सुप्रीम कोर्टाने आपल्या आदेशात महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आमच्या आदेशात जे सांगितलं नाही ते राहुल यांनी का सांगितलं? आणि कोर्टाच्या आदेशाचा वापर राजकीय कारणांसाठी करता कामा नये. या आदेशामुळे काँग्रेसचा खोटेपणा उघड झाल्याचा दावाही त्यांनी केला.

कोर्टात काय झालं?

लोकसभेच्या निवडणुकांचा प्रचार पूर्ण रंगात आला असताना चौकिदार चोर है या घोषणेवरून राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टाची दिलगीरी व्यक्त केली. अनावधानाने ही घोषणा केली असं राहुल गांधी यांनी सांगितल्याने भाजपला प्रचाराला नवा मुद्दा मिळाला आहे. तर आम्ही चौकिदार चोर आहे या घोषणेवर काँग्रेस कायम असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.काँग्रेसला धक्का?

2019 च्या महासंग्रामाच्या दरम्यान देशभरात जो प्रचार सुरु आहे, त्यात एक घोषणा आणि त्याचं उत्तर चांगलच गाजलं. ती घोषणा होती चौकिदार चोर है आणि त्याला उत्तर होतं मै भी चौकिदार. सुरुवात झाली चौकीदार चोर है या घोषणेने आणि त्याला टीम मोदींने मै भी चौकिदार असं जोरदार प्रत्युत्तर दिलं. भाजपला काँग्रेसच्या या घोषणेची दखल घेणं भाग पडलं.राहुल गांधींचा माफिनामा

मात्र प्रचाराच्या भरात राहुल गांधी यांनी सुप्रीम कोर्टानेही नरेंद्र मोदी यांना चोर म्हटलं असं म्हटलं होतं. असं म्हणणं राहुल गांधी यांना महागात पडलं. त्यांच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टात अवमानना यचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना राहुल गांधी यांनी एक पाऊल मागे घेत दिलगीरी व्यक्त केली. प्रचाराच्या भरात मी असं बोललो असं राहुल म्हणाले. प्रचार ऐन रंगात आला असताना राहुल गांधींना दिलगीरी व्यक्त करावी लागली हे काँग्रेसला धक्का देणारं असल्याचं बोललं जातंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2019 08:41 PM IST

ताज्या बातम्या