भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार सनी?

भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार सनी?

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत बॉलिवूड कलाकाराचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 एप्रिल : सोशल मीडियावर एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि बॉलिवूड अभिनेता सनी देओल दिसत आहेत. यावरून सनी देओल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजपसाठी प्रतिष्ठेची असलेली जागा पंजाबमधील गुरूदासपूर मतदारसंघातून सनी देओल लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे.

यापूर्वी सनीनं शुक्रवारी (19 एप्रिल) अमित शहा यांची भेट घेतली होती. पुणे विमानतळावरील व्हीव्हीआयपी विश्रांतीगृहात अमित शहा आणि सनी यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. सुरूअसलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सनी देओलला पंजाबच्या गुरूदासपूर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. पण या वृत्तास अद्याप भाजपकडून अधिकृतरित्या दुजोरा देण्यात आलेला नाही. दुसरीकडे, पंजाबमध्ये भाजप आणि शिरोमणि अकाली दलानं हातमिळवणी केली आहे.

अमित शाह के साथ सनी देओल की फोटो वायरल, क्‍या BJP का थामेंगे हाथ?

गुरूदासपुर मतदारसंघ : दोन दशकापर्यंत भाजपचं वर्चस्व

दरम्यान, गुरूदासपूर मतदारसंघावर दोन दशकांपर्यंत भाजपचे वर्चस्व आहे. या जागेवरून विनोद खन्नादेखील भाजपच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत.  विनोद  खन्ना यांनी  1998, 1999, 2004 आणि 2014 मध्ये या जागेवरून विजय मिळवला होता. 27 एप्रिल 2017 रोजी विनोद खन्ना यांचे निधन झाल्यानंतर या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांना रेकॉर्डब्रेक मतं मिळाली होती.

वाचा अन्य बातम्या

VIDEO : गोलंदाज, फलंदाजही शोधू लागले बॉल, हा असा अजब नो-बॉल पाहिलात का?

IPL 2019 : 'या' सहा भारतीय खेळाडूंचा झाला 'असा' अपमान

SPECIAL REPORT :...जेव्हा उदयनराजे मावशीच्या हातचे पोहे खातात

VIDEO :...आणि महिलेच्या प्रश्नावर गिरीश बापटांची बोलती बंद

First published: April 21, 2019, 7:13 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading