गुरूदासपूर, 29 एप्रिल : अभिनेता सनी देओलला भाजपनं गुरूदासपूरमधून उमेदवारी दिली आहे. आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना सनी देओलनं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये तब्बल 53 कोटींचं कर्ज असल्याचं म्हटलं आहे. पत्नी आणि स्वत:वर 53 कोटींचं कर्ज असल्याचं सनी देओलनं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. तर, 1 कोटीपेक्षा देखील जास्त जीएसटी शिल्लक असल्याचं सनी देओलनं म्हटलं आहे. धर्मेद्र आणि हेमा मालिनीच्या संपत्तीची तुलना करता सनी देओलकडील संपत्ती कमी असल्याचं दिसून येतंय. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सनी देओलला पंजाबनमधील गुरूदासपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
वडिलांच्या चितेची आग विझण्यापूर्वी त्यानं केलं मतदान
सनी देओलची नेमकी संपत्ती किती?
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सनी देओलनं 87 कोटींची संपत्ती असून 53 कोटींचं कर्ज असल्याचं म्हटलं आहे. सनी देओलकडे 26 लाख रूपये रोकड तर पत्नीकडे 16 लाख रूपये रोकड आहे. सनी देओलच्या बँक खात्यात 9 लाख रूपये जमा आहेत. तर, पत्नीच्या खात्यात 19 लाख रूपये आहेत.
सनी देओल आणि पत्नीनं बँकेडून 51 कोटींचं कर्ज घेतलं आहे. तर, दोघांवर 2.5 कोटी रूपयाचं सरकारी कर्ज आहे. सनी देओलकडे 1 कोटी 69 लाखांच्या गाड्या तर, पत्नीकडे 1 कोटी 56 लाखांचे दागिने आहेत.
पूनम महाजनांच्या संपत्तीमध्ये घट, आकडा पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का!
सनीवर किती गुन्हे दाखल आहेत?
सनी देओलवर एक देखील गुन्हा दाखल नाही. शिवाय, कोणत्याही प्रकारची शिक्षा देखील झालेली नाही.
शिवसेना - भाजप खासदारांची संपत्ती 60 टक्क्यांनी वाढली
आई – वडिलांकडे किती संपत्ती?
वडील धर्मेंद्र आणि सावत्र आई हेमा मालिनीकडे सनी देओलपेक्षा देखील जास्त संपत्ती आहे. हेमा मालिनीकडे 114 कोटी तर, धर्मेंद्रकडे 135 कोटींची संपत्ती आहे. हेमा मालिनी यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामधून ही माहिती समोर आली आहे. हेमा मालिनी या मधुरामधून लोकसभा निवडणूक लढवत आहेत.
VIDEO : मावळमध्ये मतदानासाठी तुफान गर्दी, रांगेत उभं राहण्यावरून भांडणं