S M L

राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, घरातल्याच व्यक्तीची होती इच्छा

लोकसभा निवडणूक 2019मध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC)बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली.

News18 Lokmat | Updated On: May 26, 2019 06:13 PM IST

राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा, घरातल्याच व्यक्तीची होती इच्छा

नवी दिल्ली, 26 मे : लोकसभा निवडणूक 2019मध्ये काँग्रेस पक्षाचा दारूण पराभव झाला. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या (CWC)बैठकीत अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. पण त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला. CWCच्या बैठकीत जरी त्यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव फेटाळण्यात आला असला तरीही राहुल गांधींनी राजीनामा द्यावा, अशी घरातल्याच एका सदस्याची इच्छा होती. ही इच्छा दुसऱ्या-तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीची नसून त्यांच्या बहीण आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका गांधींनी म्हटलं की, 'भावानं घेतलेल्या निर्णयामागील नेमकं कारण मला माहिती आहे'.

शनिवारी (25 मे ) CWC बैठकीत राहुल गांधींनी सांगितलं की, 'निवडणुकीतील पक्षाची कामगिरी पाहता मी अध्यक्षाच्या स्वरूपात काम करू इच्छित नाही, पण मला पक्षासाठी काम करायचं आहे'. तर दुसरीकडे, पक्ष नेतृत्वासाठी एक पर्याय शोधण्यासाठी राहुल गांधींना वेळ द्यावा, असं प्रियंका गांधींनाही वाटत आहे.

पाहा :SPECIAL REPORT : लेकापेक्षा लेकी भारी, दिल्लीला जाणार आता स्वारी!


काँग्रेसचा पुढील अध्यक्ष गांधी परिवारातला नको - राहुल गांधी

शनिवारी (25 मे) झालेल्या CWCच्या बैठकीत राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्ती केली होती. पण बैठकीत राहुल यांच्या राजीनाम्याचा प्रस्ताव एकमतानं फेटाळण्यात आला, अशी माहिती काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुरजेवाला यांनी सांगितले की, 'काँग्रेसनं पक्षानं पराभव स्वीकारला आहे. पण पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधीच कायम राहतील. पक्षांतर्गत बदल करण्याचे पूर्ण अधिकारी राहुल गांधी यांना देण्यात आले आहेत'.

पाहा :SPECIAL REPORT : 'राज'आदेशाचं झालं काय, मनसेची मतं गेली कुठे?

Loading...

अध्यक्षपदासाठी प्रियंका गांधीचंही नाव सुचवू नका - राहुल गांधी

दरम्यान, 'काँग्रेसचा पुढील अध्यक्ष गांधी परिवारातला असू नये. तसंच प्रियंका गांधींच्या नावाचाही प्रस्ताव अध्यक्षपदासाठी ठेवला जाऊ नये', असेही राहुल गांधींनी काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सांगितल्याची माहिती समोर आली आहे.

जवळपास सहा तास काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक सुरू होती. बैठकीदरम्यानच राहुल गांधींनी सांगितलं की, 'मी अध्यक्षाच्या स्वरूपात काम करू इच्छित नाही, पण मला पक्षासाठी काम करायचं आहे'. यानंतर बैठकीतून राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वाड्रा बाहेर पडले. बैठकीत काँग्रेस वर्किंग कमिटीच्या सदस्यांनीही आपापलं म्हणणं मांडलं. राहुल गांधींनी आपल्या पदाचा राजीनामा देऊ नये, असं एकमत सदस्यांनी व्यक्त केलं. सदस्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर राहुल गांधींनी बैठकीला संबोधित केलं.

पाहा :VIDEO: भरधाव कारचा थरार! चालकाचं नियंत्रण सुटल्यानं थेट घुसली चहाच्या टपरीत

'या' तारखेला राहुल गांधी देणार होते राजीनामा

यापूर्वी 23 मे रोजीदेखील राहुल यांनी सोनिया गांधींकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर सोनियांनी त्यांना काँग्रेस वर्किंग कमिटीसमोर आपलं म्हणणं मांडण्याचा सल्ला दिला. शनिवारीदेखील(25 मे) राहुल गांधी आपला राजीनामा देऊ इच्छित होते, पण बैठकीपूर्वी प्रियंका गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींना समजावलं. 'निवडणुकीत जय-पराजय होत असतो, यासाठी राजीनामा देण्याची गरज नाही', अशा शब्दांत मनमोहन सिंग यांनी राहुल गांधींची समजूत काढली.

पराभवावर विचारमंथन

लोकसभा लोकसभा निवडणूक 2019मध्ये मोदी त्सुनामीमध्ये काँग्रेसचा दणदणीत पराभव झाला. पराभवावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेसचे दिग्गज नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग देखील हजर होते.

VIDEO : स्मृती इराणींना अश्रू अनावर, कार्यकर्त्याच्या पार्थिवाला दिला खांदा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2019 05:38 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close