सोनिया गांधी यांच्या संपत्तीत घट; प्रतिज्ञापत्रात दिली माहिती

सोनिया गांधी यांनी आपल्या संपत्तीमध्ये घट झाल्याचं म्हटलं आहे. प्रतिज्ञापत्रात त्यांनी तशी माहिती दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 04:10 PM IST

सोनिया गांधी यांच्या संपत्तीत घट; प्रतिज्ञापत्रात दिली माहिती

रायबरेली, 11 एप्रिल : युपीएच्या अध्यक्षा आणि काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी या उत्तर प्रदेशातील रायबरेली या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. दरम्यान त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. त्यापूर्वी त्यांनी होमहवन केलं. शिवाय, जोरदार शक्ती प्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सोनिया गांधी यांनी आपल्या संपत्तीमध्ये घट झाल्याचं म्हटलं आहे. निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात सोनिया गांधी यांनी 2017-18 या आर्थिक वर्षात 9 लाख 60 हजार 700 रूपये आयटीआर जमा केला. तर, 2013-14 मध्ये त्यांनी 17 लाख 60 हजार 32 रूपये आयटीआर जमा केल्याची माहिती आपल्या प्रतिज्ञापत्रात दिली आहे.Loading...


सोनिया गांधी यांची संपत्ती किती?


सोनिया गांधी यांच्या युको बँकमध्ये 1 कोटी 76 लाख 59 हजार 883 रुपयांची एफडी 2 कोटी 44 लाख 96 हजार 405 रुपये शेअर आहे अशी माहिती दिली आहे. त्यांच्याकडे 28 लाख 53 हजार रूपयाचे टॅक्स बॉन्ड आणि 72 लाख 25 हजार 414 रुपयांचे पोस्टल एनएसएस जमा आहेत. तर , 5 लाखाचं कर्ज असल्याची माहिती सोनिया गांधी यांनी दिली आहे. पण, त्यांच्याकडे स्वत:ची गाडी नाही.

सोनिया गांधींकडे 59 लाख 97 हजार 211 रुपयांचे दागिने आहेत. दिल्लीतील सुल्तानपूर येथे सोनिया गांधी यांच्या नावे 3 गुंठे जमीन आहे. तर, इटलीमध्ये असलेल्या वडिलोपार्जित संपत्तीची किंमत 23 लाख 20 हजार 110 रुपये आहे. सोनिया गांधी यांच्याकडे 4 कोटी 29 लाख 82 हजार 13 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.


शिवसेना - भाजप खासदारांची संपत्ती 60 टक्क्यांनी वाढली

पूनम महाजनांच्या संपत्तीमध्ये घट

2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात श्रीमंत ठरलेल्या मुंबईतील भाजप उमेदवार आणि विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या संपत्तीमध्ये मात्र तब्बल 106 पटींनी घट झाली आहे. भाजप खासदार पूनम महाजन यांची 2014मध्ये 108 कोटी रुपयांची असलेली संपत्ती 2019मध्ये 2 कोटी 20 लाखांवर आली आहे. त्यांच्याकडे स्वत:च्या मालकीचे घर, जमीन, सोने काहीही नसल्याचे महाजन यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.


VIDEO: राफेल मुद्यावरून राहुल गांधींनी परत मोदींवर साधला निशाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 04:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...