News18 Lokmat

हा तर अमेठीच्या लोकांचा अपमान; स्मृती इराणींचा हल्लाबोल

राहुल गांधी आता वायनाडमधून लोकसभा मैदानात उतरल्यानं स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 4, 2019 01:24 PM IST

हा तर अमेठीच्या लोकांचा अपमान; स्मृती इराणींचा हल्लाबोल

नवी दिल्ली, 04 एप्रिल : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता वायनाडमधून देखील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यानंतर आता अमेठीतील भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी राहुल गांधींवर जोरदार हल्ला चढवला आहे. '15 वर्षे खासदार असणाऱ्या राहुल गांधी यांनी अमेठीच्या विकासासाठी काहीही केलं नाही. राहुल गांधी आता वायनडमधून निवडणूक लढवत आहेत हा अमेठीच्या लोकांचा अपमान आहे. तो आता सहन केला जाणार नाही'. अशा शब्दात स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. उत्तर प्रदेशातील अमेठी हा राहुल गांधी यांचा पारंपरिक मतदार संघ. पण, कार्यकर्त्यांनी केलेल्या आग्रहाखातर राहुल गांधी केरळमधील वायनाडमधून देखील लोकसभा रिंगणात उतरले आहेत. दरम्यान, अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी तर, वायनाडमधून भारत धर्म जनसेनाचे अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिलं आहे. 2014मध्ये देखील स्मृती इराणी यांनी राहुल गांधी यांना आव्हान दिलं होतं. पण, त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.Loading...


राहुल गांधीसाठी मुस्लिम लीग मैदानात

दरम्यान, मुस्लिम लीगनं देखील राहुल गांधी यांना पाठिंबा दिला असून प्रचारासाठी कार्यकर्त्यांनी आता कंबर कसली आहे. शिवाय, राहुल गांधी वायनाडमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह पाहायाला मिळत आहे. देशात सात टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुका होणार असून निकाल 23 मे रोजी लागणार आहे. दरम्यान, आता वायनाडमधील निकालाकडे देखील सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.


काँग्रेसला मिळणार उभारी?

इतिहसात डोकावून पाहता दक्षिण भारत काँग्रेससाठी लकी ठरला आहे असं म्हणता येते. कारण, पराभव स्वीकारावा लागल्यानंतर नव्या उमेदीनं उभं राहण्याचं बळ दक्षिण भारतानं काँग्रेसला दिलं आहे. त्यामुळे राहुल गांधी यांच्यासाठी वायनाड लकी ठरणार का?हे पाहणं औत्सुक्याचं आहे. यापूर्वी इंदिरा गांधी आणि सोनिया गांधी यांनी देखील दक्षिण भारतातून निवडणुका जिंकत काँग्रेसला उभारी दिली होती.


SPECIAL REPORT: शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेचा फायदा नेमका कुणाला होणार?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 4, 2019 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...