VIDEO 'स्मृती इराणींची अमेठीत फक्त ड्रामेबाजी'

VIDEO 'स्मृती इराणींची अमेठीत फक्त ड्रामेबाजी'

अमेठीत 2014 पेक्षा कमी मतदान झालं आहे. कमी मतदानाचा फायदा कुणाला होणार याविषयी अंदाज व्यक्त करण्यात येत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली 06 मे : अमेठीतल्या भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनी आज काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. इराणींच्या या आरोपानंतर देशभर वादळ निर्माण झालं. पण स्मृती इराणींचा हा आरोप म्हणजे केवळ राजकीय ड्रामेबाजी असल्याचं मत राजकीय विश्लेषक जीव्हीआर शास्त्री यांनी व्यक्त केलंय. CNNnews18 च्या TheNationAt5 या कार्यक्रमात ते बोलत होते.

आज दिवसभरात झालेल्या या आरोप प्रत्यारोपात राहुल गांधी यांनी त्यांचा अमेठीचा दौराही रद्द केला. त्यामुळे या चर्चेत आणखी भर पडली. स्मृती इराणी यांनी गेले काही दिवस अमेठी मतदारसंघ पिंजून काढला होता. मतदानाच्या पाचव्या टप्प्यात आज अमेठीत मतदान झालं. मतदानाचा दिवस असल्याने राहुल यांचा आपल्या मतदारसंघा येण्याचा कार्यक्रमही होता.

मात्र दुपारी ते येणार नसल्याचं स्पष्ट झाल्याने स्मृती इराणींनी त्यांच्यावर टीका केली. मतदानाच्या दिवशी राहुल गांधी यांनी मतदारसंघात न येणं हा मतदारांचा सर्वात मोठा अपमान असल्याची टीकाही त्यांनी केली. त्याआधी इराणींनी सकाळी एक व्हीडीओ ट्विट करत काँग्रेस बळजबरीने मतदान केंद्र ताब्यात घेत असल्याचा आरोप केला होता.

मात्र नंतर आयोगाने त्या व्हीडीओत काही तथ्य नसल्याचं सांगितलं. अमेठीत यावेळी 2014 पेक्षा कमी मतदान झालं आहे. कमी मतदानाचा फायदा कुणाला होणार याची आता चर्चा रंगलीय. मतदान कमी झाल्याचा फटका भाजपला बसू शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मतदारांमध्ये उत्साह नसल्याने नवा मतदार बाहेर पडला नाही अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

First published: May 6, 2019, 7:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading