पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, TMC-BJPच्या कार्यकर्त्यांचा खून

पश्चिम बंगालमध्ये पुन्हा हिंसाचार, TMC-BJPच्या कार्यकर्त्यांचा खून

पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यातील मतदान सुरु असून राज्यात पुन्हा हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत.

  • Share this:

कोलकाता, 12 मे : लोकसभेच्या सहाव्या टप्प्यातील मतदान आज होत आहे. यात पश्चिम बंगालमधील 8 जागांवर मतदान सुरु आहे. मात्र, मतदानाच्या आधी बंगालमधीव झारग्राम इथं भारतीय जनता पार्टीच्या बूथ कार्यकर्त्याचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याचाही मृतदेह आढळला आहे. याशिवाय तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे.

पश्चिम बंगालमध्ये मतदानासोबतच हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. मिदनापूर इथल्या तृणमूलच्या दोन कार्यकर्त्यांवर गोळीबार करण्यात आला आहे. दोन्ही कार्यकर्त्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

झारग्राम इथं भाजप कार्यकर्त्याचा खून झाल्याचा आरोप स्थानिक नेत्यांनी केला आहे. रामेन सिंह नावाच्या कार्यकर्त्याच्या खूनाला तृणमूल जबाबदार असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, पोलिसांनी हा खून नसल्याचं म्हटलं आहे. प्राथमिक तपासात रामेन सिंह आजारी होता असं पोलिसांनी सांगितले. त्याचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.

मरधारातील कांठी इथं तृणमूल कार्यकर्त्याची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तृणमूल कार्यकर्ता एक दिवस आधी बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याचा मृतदेहच मिळाला. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

आतापर्यंत प्रत्येक टप्प्यातील मतदानावेळी बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. यात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी असेल किंवा मतदान केंद्रावर बॉम्बहल्ला यांचा समावेश आहे. हिंसाचारानंतरही बंगालमधील मतदानाची टक्केवारीसुद्धा नेहमीच जास्त राहिली आहे.

SPECIAL REPORT: रायगड: राज ठाकरे इफेक्ट शिवसेना खासदाराला हॅट्रीकपासून रोखणार का?

First published: May 12, 2019, 7:52 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading