VIDEO 'फक्त भावना भडकवूनच भाजप सत्तेवर आला'

VIDEO 'फक्त भावना भडकवूनच भाजप सत्तेवर आला'

'भाजपने गेल्या पाच वर्षात काय कामं केलीत त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे मात्र केवळ गिधाडासारखा एखादा शब्द घेऊन त्यावर राजकारण करायला नको.'

  • Share this:

मुंबई 10 मे : लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे राहिलेले असताना काँग्रेसचे नेते सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यामुळे आगीत तेल ओतलं गेल. राहिलेल्या दोन टप्प्यांमध्ये राजधानी दिल्ली आणि पंजाबमध्ये मतदान असल्याने मोदींच्या ट्रॅपमध्ये काँग्रेस फसल्याची भावना व्यक्त केली जातेय. 80 च्या दशकात भाजपच्या फक्त दोन जागा होत्या. त्या दोन जागांवरून भाजप आज सत्तेत आला तो भावना भडकवून अशी टीका राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी केली आहे. 'न्यूज18लोकमत'च्या बेधडक कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

पंजाब आणि दिल्लीत एकही जागा मिळणार नाही असं भाजपला दिसून आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाणीवपूर्वक राजीव गांधी यांच्यावर आरोप केला आहे. 1984 च्या दंगलीबद्दल काँग्रेसने अनेकदा खेद व्यक्त केलाय. त्याला आता अनेक दशकं उलटून गेलीत. दुसरे कुठलेही विषय नसल्याने नरेंद्र मोदी जुने विषय उकरून काढत असल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी केलाय.

भाजपने गेल्या पाच वर्षात काय कामं केलीत त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे मात्र केवळ गिधाडासारखा एखादा शब्द घेऊन त्यावर राजकारण करायला नको असं मत राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या विद्या चव्हाण यांनी व्यक्त केलं. हिंदू मुस्लिम दंगली घडवून आणि भावना भडकवून भाजप दोन जागांवरून आज सत्तेत आला असा आरोपही त्यांनी केला.

सॅम पित्रोदा यांच्या वक्तव्यांनी कायम काँग्रेसचं नुकसान केलंय. ते काँग्रेसमध्ये कुठल्याही पदावर नाहीत आणि मुरलेले राजकारणीही नाहीत. त्यांच्या वक्तव्याचं राजकारण करणं योग्य नाही मात्र काँग्रेसनेच भाजपच्या हातात कोलीत दिलं असं मत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी यांनी व्यक्त केलं.

तर 1984 च्या दंगलींचा मुद्दा उपस्थित करून गुजरात दंगलीचं नरेंद्र मोदी यांचं पाप पुसलं जाणार नाही असं मत सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी यांनी व्यक्त केलं.

INS विराट प्रकरणावर राहुल गांधी यांची प्रतिक्रिया

'काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नामदार परिवाराने देशाची आन बाण आणि शान असलेल्या INS विराटचा टॅक्सीप्रमाणे वापर केला होता. राजीव गांधी पंतप्रधान असताना 10 दिवसांच्या सुट्टीवर होते. तेव्हा INS विराटचा वापर केल्याचा आरोप नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भाषणादरम्यान केला होता.' त्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पहिल्यांदा यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'INS विराटचा वापर कुणीही सुट्टीसाठी का करेल? ती क्रुझशिप नाही.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आरोपानंतर राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच थेट उत्तर दिलं आहे. मागील काही दिवसांपासून राजीव गांधी आणि INS विराट यावरून आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत. त्याबाबत दावे – प्रतिदावे देखील केले जात आहेत. शिवाय, 'सैन्य दल हे कुणाचेही खासगी सैन्य नसल्याचं' राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

'मी वडील राजीव गांधी यांच्यासोबत INS विराटवर गेलो होतो. पण, सुट्टीसाठी नाही. माझे वडील पंतप्रधान असताना आम्ही INS विराटवर गेलो. पण ती एक ऑफिशियल भेट होती' असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

First published: May 10, 2019, 6:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading