बूट फेकून मारणं हा काँग्रेसचा डाव, भाजपने केला आरोप

बूट फेकून मारणं हा काँग्रेसचा डाव, भाजपने केला आरोप

शक्ती भार्गव याची आई दया भार्गव यांनी आपलं मुलाशी आता काही नातं नाही, असं म्हटलं आहे. आपल्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली 18 एप्रिल : राजधानी दिल्लीत झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत बूट फेकून मारणं हा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केला आहे. केवळ स्टंटबादी करण्यासाठीच हे कृत्य काँग्रेस समर्थकाने केलं असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेसच्या संस्कृतीचं ते प्रतिक असल्याची टीकाही त्यांनी केली.

भाजपचे प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिंहन हे पत्रकार परिषद घेत असताना त्यांना बूट फेकून मारण्यात आला होता. साध्वी प्रज्ञा सिंग यांना उमेदवारी देण्यावरून उठलेल्या वादावर ते पत्रकार परिषद घेत होते. बूट फेकून मारणारा व्यक्त हा डॉ. शक्ती भार्गव असल्याची माहितीही नुपूर यांनी दिली. त्या म्हणाल्या, डॉ. भार्गव यांच्या फेसबुक वॉलवर सरकारच्या विरोधात लिहिलेलं आहे. त्यामुळे त्यांना काँग्रेसनेच चिथावणी दिली असा आरोपही त्यांनी केला.

हा बूट भाजपच्या प्रवक्त्यांवर नाही तर लोकशाहीवर मारलेला आहे. अशा घटना कधीही समर्थनीय नाहीत. सगळ्याच राजकीय पक्षांनी त्याचा तीव्र निषेध केला पाहिजे. मात्र सध्या सगळेच राजकीय पक्ष अशा घटनांचं राजकारण करत असतात ही दुर्दैवाची गोष्ट आहे असं मत ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंग यांनी व्यक्त केलं.

कोण आहेत शक्ती भार्गव

भाजपच्या पत्रकार परिषदेत बूट फेकून मारणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे शक्ती भार्गव. तो उत्तर प्रदेशमधल्या कानपूरचा आहे. बूट फेकण्याच्या घटनेनंतर लगेचच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. शक्ती भार्गव हा भार्गव हॉस्पिटलचा मालक आहे. त्याने 2018 मध्ये तीन बंगले विकत घेतले होते. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने त्याच्यावर छापा घातला होता. या 3 बंगल्यांचा खरेदी व्यवहार 11 कोटी 50 लाख रुपयांचा होता. यासाठीचे पैसे शक्तीसिंह भार्गव याच्याच खात्यातून दिले गेले. पण त्याची पत्नी आणि मुलांच्या नावावर त्याने ते खेरदी केले होते.

व्हिसल ब्लोअर असल्याचा दावा

शक्ती भार्गव याने आपल्या फेसबुक अकाउंटवर तो व्हिसल ब्लोअर आहे,असं म्हटलं आहे. काही दिवसांपासून तो भाजपच्या कार्यालयात येत होता, अशीही माहिती पुढे आली आहे. कानपूरमधल्या गिरण्या बंद पडल्याच्या विरोधात त्याने आवाज उठवला होता.

पैसै आले कुठून ?

बंगल्यांच्या खरेदी व्यवहारात शक्ती भार्गव याच्यावर बेहिशेबी संपत्ती बाळगल्याचा आरोप झाला होता. त्याप्रकरणी त्याचा तपासही झाला. या बंगल्यांच्या खरेदीतले पैसे कुठून आले हे तो सांगू शकला नव्हता. प्राप्तिकर विभागाने डॉ. शक्ती भार्गवच्या घरून 28 लाख आणि 50 लाख रुपयांचे दागिने जप्त केले होते.

शक्ती भार्गव याची आई दया भार्गव यांनी आपलं मुलाशी आता काही नातं नाही, असं म्हटलं आहे. आपल्या मुलाचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असं त्यांनी सांगितलं. शक्ती भार्गव आम्हाला त्रास द्यायचा म्हणून आम्ही त्याच्यापासून वेगळे राहतो, असंही दया भार्गव म्हणाल्या.

Tags: BJP
First Published: Apr 18, 2019 06:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading