अमेठीत EVM सुरक्षा धाब्यावर, हायप्रोफाईल मतदारसंघातील धक्कादायक प्रकार!

अमेठीत EVM सुरक्षा धाब्यावर, हायप्रोफाईल मतदारसंघातील धक्कादायक प्रकार!

EVMच्या सुरक्षे संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

  • Share this:

अमेठी, 08 मे: EVMच्या सुरक्षे संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमेठीतील एका स्ट्राँग रूममधून EVM बाहेर घेऊन जात असल्याची घटना घडली आहे. येथील गौरीगंज परिसरातील मनीषी महिला महाविद्यालयात मतदानानंतर EVM ठेवण्यात आले होते. पण बुधवारी येथील काही EVM ट्रकने दुसरीकडे घेऊन जात असल्याचे वृत्त बाहेर आले. या घटनेचे वृत्त कळताच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेंद्र मिश्रा यांनी घटनास्थळी धाव घेतली.

EVM एका ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जात असताना येथे कोणताही अधिकारी उपस्थित नव्हता. हे सर्व EVM ट्रक घेऊन जात होते. यावर मिश्रा यांनी आक्षेप घेतल्यानंतर EVM दुसरीकडे घेऊन जाण्याचे काम थांबवण्यात आले. यासंदर्भात मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, EVM स्ट्राँग रूममधून हलवण्याचे प्रकरण संशयास्पद होते. मतदान झाल्यानंतर EVMसंदर्भात कोणतीही माहिती पक्षाला तसेच उमेदवारांना दिली जाते. पण यावेळी अशी कोणतीच माहिती देण्यात आली नसल्याचे त्यांनी सांगितले.

घटनास्थळी असलेल्या कर्मचाऱ्यांकडे यासंदर्भात चौकशी केली असता त्यांनी ज्या EVMचा मतदानासाठी वापर केला गेला नाही, त्या सुलतानपूर येथे पाठवल्या जात होत्या, असे सांगितले. अमेठी लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान झाले आहे. येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी विरुद्ध भाजपच्या स्मृती इराणी यांच्यात लढत होत आहे.

देशातील हायप्रोफाईल मतदारसंघात झालेल्या EVMच्या या घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

VIDEO : 'मुळशी पॅटर्न'चं वेगळा, नवरीला आणण्यासाठी नवरदेव थेट पोहोचला हेलिकाॅप्टरने!

First published: May 8, 2019, 9:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading