नवी दिल्ली, 06 एप्रिल : भाजपच्या स्थापना दिनीच भाजप खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपवर टिका देखील केली. भाजपामध्ये हळूहळू हुकूमशाही येत आहे. पण, मी केवळ सतत सत्याचीच बाजू धरली. मी कायम शेतकरी, तरूण आणि बेरोजगारीबद्दल बोललो. जेव्हा नोटाबंदी विरोधात बोललो तेव्हा मला देशद्रोही ठरवलं गेल्याची टिका शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी केली. भाजपला आपल्या विरोधकांमध्ये केवळ शत्रुच दिसतो अशी टिका देखील यावेळी त्यांनी केली.
सिन्हा यांच्या काँग्रेस प्रवेशावेळी प्रवक्ते रणदिपसिंह सुरजेवाला आणि शक्ति सिंह गोहिल यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसची बिहारमध्ये ताकद वाढली अशी प्रतिक्रिया देखील यावेळी गोहिल यांनी दिली. दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांना पाटनामधून काँग्रेस उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे रविशंकर प्रसाद विरूद्ध शत्रुघ्न सिन्हा असा सामना रंगताना दिसेल.
वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केल्यानं सिन्हा यांच्यावर भाजप नेतृत्व नारज होतं. त्यामुळे त्यांना पाटनामधून तिकीट नाकारलं गेलं होतं. त्यानंतर त्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
Delhi: Veteran actor and BJP MP Shatrughan Sinha joins Congress in presence of Congress General Secretary KC Venugopal and Randeep Surjewala pic.twitter.com/T1izPmSEEu
— ANI (@ANI) April 6, 2019
पत्नी देणार राजनाथ सिंह यांना आव्हान
दरम्यान, शत्रुघ्न सिन्हा यांची पत्नी आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा यांची आई पूनम सिन्हा या केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांच्याविरुद्ध निवडणूक लढणार आहेत. त्यांना समाजवादी पक्षाकडून लखनऊमधून उमेदवारी मिळाली आहे.त्यामुळे या लढतीकडे देखील सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.
VIDEO: गिरगावातल्या शोभायात्रेत अवतरले स्वप्निल जोशी, अमृता खानविलकर